धारुर तालुक्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची मंदिरात आत्महत्या….

किल्लेधारुर दि.२३ (वार्ताहर) तालुक्यातील अंजनडोह येथील शेतकरी बालासाहेब शंकरराव सोळंके (६७) वर्षे यांनी मंगळवारी दि.२३ मध्यरात्री घरासमोरील हनुमान मंदिरात गळफास घेवुन आत्महत्या (Suicide) केली.
(Debt-ridden farmer commits suicide in temple in Dharur taluka ….)
बालासाहेब शंकरराव सोळंके यांना आठ एकर शेती आहे. किल्लेधारुर (Dharur) येथील स्टेट बँकेचे दोन लाख रुपयांचे कर्ज कसे फेडावे याची ते सतत काळजी करत असत. त्या विवंचनेत हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती कुटूंबियांनी दिली. दि.२३ मध्यरात्री घरासमोरील हनुमान मंदिरात गळफास घेवुन त्यांनी आत्महत्या (Suicide) केली. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. शवविच्छेदनानंतर त्यांच्यावर अंजनडोह येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.