धारुर तालुक्यातही शालेय वस्तीगृहात कोरोनाचा शिरकाव;

किल्लेधारूर दि.४ (वार्ताहर) धारूर तालूक्यातील अंजनडोह येथील शाळेच्या वस्तीगृहात (Hostel) राहणाऱ्या एका दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांस कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली असून तालुक्यातील सुरू असणाऱ्या सर्व शाळां व वस्तीगृहांनी दक्षता घेण्याचे आवाहन शिक्षण व आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

(Corona infiltration in school dormitory in Dharur taluka also;)

धारूर तालूक्यात बुधवारी अंजनडोह येथील खाजगी संस्थेच्या वस्तीगृहातील १७ विद्यार्थ्यांची कोरोना (corona) चाचणी करण्यात आली. यात वस्तीगृहात राहणाऱ्या दहावीतील एका विद्यार्थ्याचा अहवाल कोरोना पॉजीटीव्ह (Corona Positive) आला आहे. सदरील विद्यार्थी हा माजलगाव तालुक्यातील रहिवासी असून नुकताच वस्तीगृहात (Hostel) दाखल झाला आहे. खबरदारी म्हणून वस्तीगृहातील विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. विद्यार्थी कोरोना पॉजीटीव्ह (Corona Positive) निघाल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. शिक्षण व आरोग्य विभागाने सर्व शाळानी दक्षता घेत खबरदारीचे कोविड नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, लातूर, सोलापुर व वाशीम येथील वस्तीगृहात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी कोरोना बाधित आढळली होती. याच धर्तीवर आरोग्य विभागाने संबंधित संस्थेस शाळा व वस्तीगृहात कोरोना प्रादुर्भाव थांबवण्यासाठी मास्कचा वापर, सॕनिटायझर करुन निर्जंतूकीकरण करणे व विद्यार्थ्यांस लक्षणे आढळल्यास तात्काळ आरोग्य विभागाशी संवाद साधण्याच्या सुचना केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!