धनंजय मुंडे पाठोपाठ अब्दूल सत्तार बीड जिल्ह्यातील बांधावर

अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीची करणार पाहणी

बीडः दि.१९(प्रतिनिधी) काल सामाजिक न्याय मंत्री व बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची पाहणी थेट बांधावर जावून केली. यानंतर आज राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे खार जमिनी विकास, विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार पाहणी करण्यासाठी बीड जिल्हा दौर्‍यावर येत आहेत.

गेल्या आठवड्यात बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आ. प्रकाशदादा सोळंके यांच्यासह विविध भागात रविवारी पाहणी केली. यापाठोपाठ आज राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे खार जमिनी विकास, विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार पाहणी करण्यासाठी बीड जिल्हा दौर्‍यावर येत आहेत.

असा असेल मंत्री सत्तार यांचा दौरा.

सकाळी ११.०० वाजता जालना येथून गेवराई, जि. बीडकडे प्रयाण करतील. दुपारी १२.०० वाजता माजी राज्यमंत्री श्री. बदामराव पंडीत, गेवराई, जि.बीड यांचे निवासस्थानी आगमन. दुपारी १२.४० वाजता पांढरवाडी, पाडळशिंगी, पाचेगांव, ता.गेवराई येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी. दुपारी १.३० वा.माळापुरी, लोळदगाव, शिदोड जि. बीड येथून शासकीय विश्रामगृह कडे प्रयाण करतील. दुपारी ३.०० वाजता शासकीय विश्रामगृह बीड येथे आगमन. दुपारी ३.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे आगमन व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा, माझे कुटूंब, माझी जबाबदारी, महाराजस्व अभियान या बाबत बैठक. सायं. ५.०० वाजता बीड येथून पाली, उस्मानाबाद कडे प्रयाण करतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!