मुलाच्या मारहाणीत बापाचा मृत्यू; केज तालुक्यातील खळबळजनक घटना.

केज दि.4 मे – खर्च करण्यास बाप पैसे देत नसल्याने रागाच्या भरात मुलाने आईच्या मदतीने बापाला मारहाण केल्याची घटना (दि. 23) एप्रिल रोजी केज तालुक्यातील बेंगळवाडी येथे घडली. या मारहाणीत जखमी पित्यावर बीड व पुणे (Pune) येथे उपचार सुरू होते. मात्र उपचारा दरम्यान पुणे येथे जखमी बापाचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून, या घटनेने केज तालुक्यात खळबळ उडाली आहे.

रमेश सोनाजी शिंदे असे मयताचे नाव आहे. मयत रमेश व त्याची पत्नी, मुलगा यांच्यामध्ये पैशाच्या कारणावरून सतत वादविवाद होत असे. दि.23 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास मुलगा ऋषिकेश व पत्नी हिराबाई यांच्यात खर्च करण्यास पैसे द्या म्हणून जोरदार भांडण सुरू झाले. यावेळी मुलाने अंगणातील पडलेल्या लाकडाने बापाच्या डोक्यात मारलं. या मारामुळे रमेश जाग्यावर कोसळले. तरीही मुलाचा राग कमी झाला नाही. तो मारतच होता तर, तर रमेशची पत्नी हिराबाई मुलाला मारहाणीस प्रोत्साहन देत होती.

सदर भांडणाची आरडाओरडा ऐकून शेजारी व नातेवाईकांनी धाव घेत सोडवा सोडव केली. जखमी रमेश शिंदे यांना तातडीने नेकनूर येथे दवाखान्यात हलविण्यात आले. प्रथमोपचार करून बीड येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमी रमेश शिंदे यांना हलवण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी पुणे येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पुणे येथे काही दिवसांपासून जखमी रमेश शिंदे यांच्यावर उपचार सुरू होते. येथेच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. याप्रकरणी मयताचा भाऊ बाबुराव शिंदे यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस (Police) ठाण्यात आरोपी मुलगा ऋषिकेश शिंदे, पत्नी हिराबाई शिंदे या दोघा विरोधात खूनाचा (Murder) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आई व मुलाच्या या कृत्यामुळे केज तालुक्यात खळबळ उडाली आहे.

( Father beaten to death by mother and child; Sensational incident in Kaij taluka. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!