माझं गाव

धारुर निधन वार्ता… लक्ष्मीबाई गायसमुद्रे यांचे निधन; उद्या होणार अंत्यविधी.

किल्लेधारूर दि.10 डिसेंबर – धारूर (Dharur) शहरातील वीर पांडूरंग चौक येथील लक्ष्मीबाई गायसमुद्रे (वय 70) वर्ष यांचे आज (दि.10) शुक्रवारी दुपारी 3.30 च्या सुमारास निधन झाले. त्यांचे अंत्यसंस्कार उद्या (दि.11) सकाळी 9.00 वाजता केज रोड पाण्याच्या टाकी जवळील स्मशानभूमी येथे करण्यात येणार आहेत.

(Dharur Death story … Death of Lakshmibai Gayasamudre; The funeral will be held tomorrow.)

धारुर कृषि उत्पन्न बाजार समितीत (Market Committee) अनेक वर्ष सेवा देवून सेवानिवृत्त झालेले किसनराव गायसमुद्रे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांना गेल्या काही दिवसांपुर्वी डोक्यात मार लागल्याने औरंगाबाद येथे उपचाराधिन होत्या. काल गुरुवारी त्यांची रुग्णालयातून सुट्टी झाली. मात्र आज शहरातील विर पांडुरंग चौक येथील त्यांच्या राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांचा स्वभाव अत्यंत साधा, सरळ व अत्यंत प्रेमळ असल्याने त्यांचा चाहता वर्ग मोठा होता. लहान थोरापर्यंत त्या सुपरिचित होत्या. त्यांच्या निधनामूळे शहरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनामुळे गायसमुद्रे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

त्यांच्या पश्चात पती, तिन मुल, दोन मुली सुना, नांतवडे असा मोठा परिवार आहे. त्या केज कृषि उत्पन्न बाजार समितीचे सहाय्यक सचिव (Assistant Secretary) विलास गायसमुद्रे व धारुर न्यायालयातील ॲडव्होकेट राजेश गायसमुद्रे यांच्या आई होत्या. त्यांच्या पार्थिवावर उद्या शनिवार दि.11 रोजी सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!