दुर्ग बांधणी स्पर्धेत “धारुर दुर्ग” राज्यात नंबर वन

किल्लेधारूरः दि.१९- मुंबई बोरीवली येथील Mumbai गोराई येथील साहेब प्रतिष्ठाण Saheb Pratishthan आयोजित दुर्ग बांधणी स्पर्धेत बीड Beed जिल्ह्यातील दुर्लक्षित परंतू अतिशय दुर्मिळ असलेल्या किल्ले धारुरच्या Dharur प्रतिकृतीने पहिला क्रमांक मिळवला आहे. यामुळे आयोजक व प्रतिकृती तयार करणाऱ्या कलावंताचे जिल्ह्यातून सोशल मेडियातून अभिनंदन होत आहे. सदरील दुर्ग बांधणी स्पर्धा गेल्या सात वर्षांपासुन सुरु असल्याची माहिती साहेब प्रतिष्ठाणचे अभय अंगठेकर यांनी दिली.
मुंबई Mumbai विभागातील बोरीवलीत गोराई येथे साहेब प्रतिष्ठाणच्या Saheb Pratishthan वतीने प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षीही दिवाळीच्या सुट्टीत दुर्ग बांधणी व कै. बाळासाहेब ठाकरे Thakre यांच्या स्मृती प्रित्यर्थ खुल्या व्यंगचित्र स्पर्धा आनलाईन घेण्यात आल्या. यातील जाई काजळ आयोजित दुर्ग बांधणी स्पर्धेत बीड Beed जिल्ह्यातील किल्ले धारुर Dharur या दुर्गाच्या प्रतिकृतीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. सदरील प्रतिकृती बोरीवलीच्या मातोश्री युवा समितीच्या स्वप्निल हांदे, संकेत काटे, रोहन आंबेकर, निखिल खोत यांनी तयार केली आहे. दि.१७ रविवारी शिवसेना प्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे Thakre यांच्या स्मृतीदिनी सायंकाळी ७ वाजता गोराईचा राजा क्रिडांगणावर समारंभपुर्वक पारितोषिक वितरण झाले. सदरील कलावंत व आयोजकांचे सोशल माध्यमातून अभिनंदन होत आहे.