माझं गाव

धारुर… जाचास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; तालुक्यातील दुसरी घटना.

किल्लेधारुर दि.26 जून- धारुर (Dharur) तालुक्यातील फकीर जवळा येथील अनिता मोरे या विवाहित महिलेने सासरच्या जाचास कंटाळुन आत्महत्या केलेली घटना ताजी असताना तालुक्यातील बोडखा येथील एका विवाहित महिलेने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना गुरुवार रोजी रात्री घडली.

(Dharur … Married woman commits suicide due to boredom; The second incident in the taluka.)

सुरेखा ज्ञानेश्वर उघडे (वय 33) रा.बोडखा असे मयत महिलेचे नाव आहे. एकाच महिन्यात विवाहीतेची आत्महत्या होण्याची धारुर तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. गेल्याच महिन्यात फकीर जवळा येथे विवाहितेने सासरच्या जाचास कंटाळून आत्महत्या (Suicide) केली होती.

पीडित महिलेस आरोपी संगनमताने तुला ऊस तोडणीचे काम येत नाही, असे म्हणत नेहमी त्रास देत असत. दि. 24 जून रोजी सायंकाळी 8 च्या सुमारास मयत महिलेस आरोपींनी त्रास देत, मारहाण केली होती. या नेहमीच्या जाचास कंटाळून विवाहितेने राहत्या घरातील लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली, अशी तक्रार पीडित महिलेची आई द्रोपदी संदिपान चोपडे यांनी दिंद्रुड पोलीसात (Police) दाखल केली.

सदरील तक्रारीवरून मयत महिलेचा पती ज्ञानेश्वर बुजा उघडे, सासु गंगुबाई बुजा उघडे, सासरा बुजा सखाराम उघडे आणि दिर रंजीत बुजा उघडे या चौघांवर गु.नं. 127/ 2021 अन्वये कलम 306, 498अ, 323, 34 भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी (Police) दोन आरोपींना अटक केले असून इतर आरोपी फरार आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रभा पुंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!