धारुरचा हा नेता झळकणार चित्रपटात; जिद्दारी लवकरच मोठ्या पडद्यावर.

किल्लेधारूर दि.23 डिसेंबर – धारुर (Dharur) तालुक्यातील राजकारणात महत्वाची जबाबदारी सांभाळलेल्या रविंद्र सोळंके जिद्दारी या मराठी चित्रपटात (Marathi Film) भुमिका साकारत आहेत. काल दि.22 रोजी मोहखेड येथे या चित्रपटाचे पोस्टरचे (Poster) जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ सभापती जयसिंह सोळंके (Jaysing Solanke) यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

(Dharur’s leader will be seen in the film; Jiddari on the big screen soon.)

चित्रपटाचा विषय हा त्याला त्याचा प्रेक्षक मिळवून देत असतो. असाच एक सामाजिक विषय मांडणारा चित्रपट म्हणजे ‘ जिद्दारी ‘ . मोहखेड येथे या चित्रपटाच्या पोस्टर बीड (Beed) जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ सभापती जयसिंह सोळंके व रविंद्र सोळंके यांच्या उपस्थितीत कानिफनाथ माध्यमिक विद्यालय मोहखेड येथे अनावरण करण्यात आले .

एका वेगळ्या विषयाचा आणि वेगळ्या आशयाचा जिद्दारी (Jiddari) हा चित्रपट असून या चित्रपटाची निर्मिती दिप्ती अमित शेंदारकर यांनी केलेली आहे. प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर, गायिका राजलक्ष्मी शेंदारकर यांनी गाणे गायले आहेत . तसेच अमोल शिंदे यांनी दिग्दर्शन केले आहे .

चित्रपटातील कलाकारांचे मनोबल वाढविण्यासाठी आणि त्यांचा गौरव करण्यासाठी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन सगळ्यांनी बघायला हवा. हा चित्रपट लवकर प्रदर्शित होत आहे. यावेळी चित्रपटातील कलाकार विदुला बाविस्कर, विजय अंजाण यांच्यासह चित्रपटाचे निर्माते , दिग्दर्शक व मोहखेड मधील समस्त गावकरी उपस्थित होते.

धारुर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून जबाबदारी सांभाळणारे रविंद्र सोळंके (Ravindra Solanke) या चित्रपटात भुमिका साकारत आहेत. अस्सल गावरान मातीत या चित्रपटाचे चित्रिकरण करण्यात आले असून ग्रामीण जीवनावर चित्रपटाचे कथानक आहे. सदर चित्रपट ग्रामीण लोकांच्या मनाचा छेद घेणारा असल्याने प्रेक्षकांना नक्कीच भुरळ घालणारा ठरेल असे मत जयसिंह सोळंके यांनी यावेळी व्यक्त केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!