Free style fight… धारुरच्या बसस्थानकात महिला वाहक व प्रवासी महिलेत हाणामारी ; व्हिडिओ व्हायरल.

किल्लेधारुर दि.26 अॉगस्ट – Free style fight… धारुरच्या बसस्थानकात महिला वाहक व प्रवासी महिलेत हाणामारीचा प्रकार समोर आला. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल माध्यमात व्हायरल video viral झाला असून काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील एका शाळेत शिक्षिका व स्वंयपाकी महिला भिडल्याची घटना घडली होती.
(Free style fight… Clash between female conductor and female passenger at Dharur bus station; The video went viral.)
धारुर Dharur तालुक्यातील एका शाळेत काही दिवसांपूर्वी एक सहशिक्षिका व मुलांना खाऊ देणाऱ्या महिलेचा हाणामारी Free style fight.., होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या पाठोपाठ आता धारुर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात दोन महिला एकमेकीसोबत भिडल्याचे दिसून आले. याबाबत प्राप्त माहितीनूसार धारुरहून अंबाजोगाईला जाणाऱ्या बस (क्र. एमएच 20 डि 9923 ) मधील महिला वाहक व महिला प्रवासी यांच्यात किरकोळ कारणावरुन झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर थेट हाणामारीत Free style fight झाले. धारुर Dharur बसस्थानकात खचाखच गर्दी असताना पोलिस कर्मचाऱ्यांसमोर हा प्रकार सुरु होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल video viral झाला असून प्रकरण पोलिसांत गेले असल्याचे कळते.