धारुरच्या सहाय्यक पोलिस निरिक्षकांची पदोन्नती; बीड जिल्ह्यातील पाच जणांचा समावेश.

किल्लेधारूर  दि.3 फेब्रुवारी – राज्य पोलीस दलातील 453 सहायक पोलिस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक म्हणून पदाेन्नती देत बदली करण्यात आली. यात धारुरचे (Dharur) सपोनि (API) नितिन पाटील यांच्यासह बीड पोलीस दलातील 5 जणांचा समावेश आहे. पाटील यांना पदोन्नती मिळताच त्यांचे अभिनंदन होत आहे.

(Dharur’s promotion of Assistant Inspector of Police; Including five from Beed district.)

याबाबत प्रशासनाकडून बुधवारी (दि.2) आदेश जारी करण्यात आले आहेत. किल्लेधारूर पोलीस ठाण्याचे प्रभारी नितिन दगडू पाटील यांची पदोन्नती (Promotion) होवून त्यांची पोलिस निरीक्षक म्हणून मुंबई (Mumbai) येथे बदली झाली आहे.

बीड पोलिस (Beed Police) दलातील सुभाष गणपत दासरवाड (पो.प्र.के. बाभळगाव), नितिन दगडू पाटील (मुंबई शहर), नितिन गजानन मिरकर (मुंबई शहर), अनिल लक्ष्मणराव गव्हाणकर (मुंबई शहर), आनंद केशवराव झोटे (मुंबई शहर) यांची पदोन्नतीने बदली झाली आहे.

धारुर ठाण्याला निरीक्षक मिळणार का?
किल्लेधारूर पोलिस ठाण्यात काही महिन्यापुर्वी सहाय्यक पोलिस निरीक्षक (Assistant Police Inspector) नितिन पाटील यांनी पदभार स्विकारला होता. येथील रिक्त असलेल्या पोलिस निरीक्षक (Police Inspector) पदाचा प्रभारी कार्यभार पाहणाऱ्या सुरेखा धस यांच्या बदलीनंतर पोलिस निरीक्षक पदाचा प्रभार पाटील सांभाळत होते.

मात्र आता त्यांची पदोन्नती झाल्यामुळे येथे पदाचा पोलिस निरिक्षक मिळणार की पुन्हा रिक्त राहणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही वर्षापासून धारुर पोलिस ठाण्याचा (Police station) कारभार प्रभारीवरच आहे. आता राज्यातील अनेक सहाय्यक पोलिस निरीक्षकांना पदोन्नती मिळाल्याने येथे पदाचा अधिकारी मिळण्याची अपेक्षा आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!