धारुरचे दिनेशसिंह हजारी व अंबाजोगाईचे दगडू चव्हाण या क्रीडारत्नांचा राज्य स्तरावर गौरव.

किल्लेधारूर दि.7 जुलै – धारुरचे दिनेशसिंह हजारी व अंबाजोगाईचे दगडू चव्हाण या क्रीडारत्नांचा राज्य स्तरावर गौरव होणार आहे. दिनेशसिंह हजारी व दगडू चव्हाण यांची कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू (National player) म्हणून ओळख आहे.
धारुर (Dharur) व अंबाजोगाई (Ambajogai) शहराला बीड (Beed) जिल्ह्यात विविध खेळातील योगदानामुळे वेगळी ओळख आहे. धारुर शहरातील कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू व क्रीडा क्षेत्रात मार्गदर्शक म्हणून ओळख असलेले दिनेशसिंह हजारी यांना “राज्यस्तरीय जेष्ठ खेळाडू पुरस्कार ” जाहीर करण्यात आला. या सोबतच अंबाजोगाईचे राष्ट्रीय खेळाडू व जेष्ठ मार्गदर्शक दगडू चव्हाण यांना देखील महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्यावतीने “राज्यस्तरीय जेष्ठ कार्यकर्ता पुरस्कार” जाहीर करण्यात आला. याबाबतची माहिती राज्य कबड्डी असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी (General Secretary of State Kabaddi Association) अॅड. अस्वाद पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या पुरस्काराचे वितरण येत्या 15 जुलै रोजी पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे . राष्ट्रीय खेळाडू दिनेशसिंह हजारी आणि दगडू चव्हाण यांनी अनेक खेळाडूंना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई येथे राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवर कबड्डी स्पर्धा यशस्वी घेण्यात आल्या. त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल विविध क्रीडा संघटनां व खेळाडूंकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
( Dinesh Singh Hazari of Dharur and Dagdu Chavan of Ambajogai were honored at the state level. )