परभणी व हिंगोली जिल्ह्यात भुकंप; औंढा नागनाथ, कळमनुरी व वसमतमध्ये नागरिकांत भिती.

परभणी दि.19 मे – परभणी (Parbhani) व हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ, वसमत व कळमनुरी तालुक्यातील अनेक गावात आज दि.19 बुधवार रोजी सकाळी साडेसहा व त्यानंतर एकापाठोपाठ एक असे चार आवाज झाले. या आवाजाने कोणतीही हानी झाली नाही मात्र नागरिक भयभीत झाले आहेत.

(Earthquake in Parbhani district; Fear among citizens in Aundha Nagnath, Kalamanuri and Wasmat.)

औंढा नागनाथ (Aundha Nagnath) तालुक्यातील पिंपळदरी व परिसरातील सात ते आठ गावांमध्ये बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास जमीनीत आवाज होऊन भूकंपाचा (Earthquake) धक्का जाणवला. यामध्ये घराच्या भिंती हादरले असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात मागील तीन ते चार  वर्षापासून सतत धक्के बसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

औंढा नागनाथ (Aundha Nagnath) तालुक्यातील पिंपळदरी, जामगव्हाण, सोनवाडी राजदारी, नंदापुर, टेबुरदार  या परिसरातील अजून काही गावांमध्ये सकाळी 6.30 ला अचानक जमिनीतून आवाज झाला या आवाजाने गावातील पूर्ण घरांचा थरकाप झाला होता. नागरिकांनी भूकंपाच्या (Earthquake) धक्क्यामुळे घरातून पळ काढला.

या भूकंपाचे केंद्रस्थान वसमत (Wasmat) तालुक्यातील पांगरा शिंदे आहे. या परिसरात देखील भूकंप झाल्याची माहिती आहे. सदरील भूकंपाचे धक्के मागील तीन ते चार वर्षापासून सतत जाणवत आहेत प्रशासनाने याबाबत कुठलीही उपाययोजना केलेली नाही. फक्त काही होत नाही घाबरू नका असा सल्ला प्रशासनाकडून  दिला जात आहे.

4 वर्षापासून सतत  या घटना घडत असताना प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या नाहीत.  भूवैज्ञानिक मार्फत या भागातील गुप्त आवाजाचे गुपित उघडून नागरिकांचे भय दुर करावे अशी मागणी होत आहे. या परिसरातील नागरिक भयभीत झाले असून कधी काय होईल याचा नेम नाही म्हणून अनेक नागरिक रात्रभर जागून कुटुंबातील सदस्यांची रक्षण करीत  आहेत.

परभणी (Parbhani) जिल्ह्यात हिंगोली जिल्ह्याच्या  सिमेवर काही गावात दहशत आहे. वसमत (Wasmat) तालुक्यातील पांगरा शिंदे हे जमीनीतील गुढ आवाजाचे केंद्र मानले जाते. यापुर्वीही दोन ते तीन वेळेस येथे भुकंपाचे सौम्य धक्के देखील बसल्याची नोंद लातुर येथील भुमापक यंत्रावर झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!