खा. शरद पवारांसह, अजितदादा व धनूभाऊनी घेतली खा.राऊत यांची भेट

मुंबईः दि.६- अँजिओप्लास्टीची यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर नुकतेच घरी आलेले सामनाचे कार्यकारी संपादक, खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांची खा. शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajitdada Pawar), सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत विचारपूस केली.

महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात महत्वाची भुमिका बजावणारे सामनाचे कार्यकारी संपादक खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांची नुकतीच अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली. त्यांच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर घरी परतल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajitdada Pawar) व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी निवासस्थानी भेट घेवून विचारपुस केली. यावेळी “एका वर्षात दोनवेळा हृदयाची शस्त्रक्रिया झाली तरी राऊत साहेबांचे हृदय मजबूत आणि वाणी विरोधकांना धडकी भरवणारीच आहे!” अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यानी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!