अखेर खा. राजीव सातव यांची झुंज अपयशी; प्रतिभावंत नेत्याला महाराष्ट्र मुकला.

पुणे दि. 16 मे – काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि गुजरातचे प्रभारी राजीव सातव (Congress leader Rajiv Satav) यांनी पाच दिवसांपूर्वीच कोरोनावर मात केली होती. पण, काल त्यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली असून न्युमोनियाचा (pneumonia) संसर्ग झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्यावर 22 दिवसांपासून पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये (Jehangir Hospital) उपचार सुरु होते. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. खा. राजीव सातव यांच्या निधनाने काँग्रेस मधील एका प्रतिभावंत नेत्याला महाराष्ट्र मुकला आहे.
(Finally eat Rajiv Satav’s struggle fails; Maharashtra releases talented leader)
खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण (Corona Positive) झाली होती. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आला होता. त्यामुळे त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये (Jehangir Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले. अखेर उपचाराअंती 10 मे रोजी त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे लवकरच राजीव सातव यांना रुग्ण्यालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती.
पण, काल अचानक राजीव सातव यांची प्रकृती खालावली. त्यांना न्युमोनियाचा (pneumonia) संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. राजीव सातव यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त हाती आल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली. राजीव सातव यांच्यावर जहांगीर हॉस्पिटलमध्ये गेल्या 22 दिवसांपासून उपचार सुरू आहे.
राजीव सातव हे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहे. विशेष म्हणजे, राहुल गांधी यांचे ते विश्वासू सहकारी मानले जात. मागील वर्षी अहमदबादमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं निधन झाल्यामुळे गुजरातच्या प्रभारीपदी राजीव सातव यांची निवड झाली होती. राजीव सातव हे हिंगोली मतदारसंघातून खासदार म्हणून 2014 साली निवडून आले होते. राज्यातील अनेक बिकट परिस्थितीत त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येत.
खा. राजीव सातव यांचे आज दि.16 रविवारी सकाळी निधनाची वार्ता समोर आली. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अतिशय प्रतिभावान राजकीय नेता म्हणून सातव यांची ओळख होती. गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे संबंध असलेले सातव महाराष्ट्रात ओळखले जात.