माजी खा. जयसिंगराव गायकवाड यांचा भाजप सदस्यत्वाचा राजीनामा

औरंगाबाद दि.१७- औरंगाबाद पदवीधर निवडणूक Aurangabad graduates constituency मध्ये भाजपा BJP ने तिकीट नाकारल्याने माजी खासदार जयसिंगराव गायकवाड (काका) Jaysingrao Gaikwad यांनी आपल्या भारतीय जनता पक्ष च्या सदस्यांचा राजीनामा दिला. त्यानी या निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज भरला असून आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे जाहीर केले. आता पक्ष काय भूमिका घेतो या कडे लक्ष्य आहे.
सध्या औरंगाबाद पदवीधर निवडणूक Aurangabad graduates constituency election सुरु असून आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. भाजपाकडून इच्छूक असलेल्यात बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्यासह माजी खासदार तथा माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड Jaysingrao Gaikwad यांचा समावेश होता. या दोघांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याने भाजपाची BJP डोकेदुखी वाढली आहे. भाजपाकडून शिरीष बोराळकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा केल्यानंतर पक्षातील बंडखोरांची मनधरणी करण्यात पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांना अपयश आल्याचे दिसुन येत आहे. आपली नाराजी जाहीर करत माजी खा. जयसिंगराव गायकवाड यांनी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कडे आपल्या भाजप BJP प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पाठवला आहे. आज दुपारी एक वाजता पक्षाची बैठक होत असल्याची माहिती मिळाली.