कोरोंना विशेष

विदर्भ आणि मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक; पहा राज्यातील मंगळवारची आकडेवारी

मुंबई दि.17 मार्च- राज्यात कोरोना संसर्ग (Corona virus) वेगाने पसरत असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra)  विदर्भ आणि मराठवाड्यात (Vidarbha and Marathwada) कोरोनाचा उद्रेक झाला आहे. मंगळवारी राज्यात १७,८६४ नवीन कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण आढळून आले आहेत. तर ८७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
(Eruption of corona in Vidarbha and Marathwada; See Tuesday’s statistics for the state)

मंगळवारी ९,५१० करोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. तर राज्यात आजपर्यंत एकूण २१,५४,२५३ करोना बाधित (Corona Positive) रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.७७ % एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.२६ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७७,१५,५२२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,४७,३२८ (१३.२५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,५२,५३१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,०६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच राज्यात एकूण १,३८,८१३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

महाराष्ट्रात (Maharashtra)  कोरोना संसर्ग (Corona virus) वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंशतः लॉकडाऊन (lockdown) लावण्यात आलेले आहे. विदर्भात कोरोना रुग्णांची (Corona virus) संख्या वाढत असल्याने कडक निर्बंध (restrictions) लादण्यात आले आहेत. नागपूरमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपूरमध्ये आठवड्याभराच्या लॉकडाऊनसह काही निर्बंध (restrictions) लावण्यात आले आहेत. परंतु या लॉकडाऊनमध्ये काही आस्थापनांना मुभा देण्यात आली आहे. यामध्ये कारखाने, बांधकामे, वाहतूक व्यवस्था सुरु आहे. यामुळे लॉकडाऊन (lockdown) असूनही रस्त्यावर लोकांची गर्दी दिसत आहे. नागपूरात विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही क्वारंटाईन करण्यात येत आहे.

मराठवाड्यातही (Marathwada) गेल्या आठवड्यापासून कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लावण्यात आलेली आहे. काही जिल्ह्यात शनिवार व रविवारचा कडक लॉकडाऊन व जनता कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. दिवसेंदिवस वाढणारी कोरोना बाधितांची संख्या प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. निर्बंध लावूनही नागरिक मात्र त्याचे पालन करत नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी बघायला मिळत आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबईसह राज्याची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने सुरु आहे. अशीच कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास लवकरच लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ शकते असे भाकित आरोग्य मंत्री राजेश टोपे व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही वर्तवले होते.

मुंबईत मागील २४ तासात १९२२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासात ४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत एकूण १२३६ कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण ३४,७५,५८१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या ३१,९८७८ वर पोहोचली आहे. १५२६३ रुग्णांवर कोरोनावरील उपचार सुरु आहेत. आतापर्यंत फक्त मुंबईत ११,५३९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!