कोरोंना विशेष

धारुर कोविड सेंटरमधून स्वॅब घेण्यास सुरुवात

किल्लेधारूर दि.१४(वार्ताहर) येथील कोविड केअर सेंटरमधून आज दि.१४ मंगळवार पासुन रुग्णांचे थ्रोट स्वॅब घेण्यास सुरुवात करण्यात आली असुन यामुळे रुग्णांची मोठी सोय होणार आहे.

जिल्ह्यात आरोग्य प्रशासनाने सहा कोविड केअर सेंटरमधून यापुर्वी थ्रोट स्वॅब घेण्याची व्यवस्था केली होती. धारुर तालुक्यातील बहुतांश थ्रोट स्वॅब केज उपजिल्हा रुग्णालयात तर काही भागातील थ्रोट स्वॅब माजलगाव ग्रामिण रुग्णालयात घेतली जात होती. थ्रोट स्वॅब घेण्यात धारुर आरोग्य प्रशासन तत्पर असुन मोठ्या प्रमाणात सेवा देत आहे. मात्र थ्रोट स्वॅब घेण्यासाठी रुग्णवाहीका व रुग्णाच्या तक्रारीमुळे विविध अडचणी येत होत्या. येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन शेकडे, डॉ. चेतन आदमाने व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांतून आता धारुरमध्येच थ्रोट स्वॅब घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येथील कोविड केअर सेंटर मध्ये तज्ञ व्यक्ती व वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असुन आज प्रत्यक्ष थ्रोट स्वॅब घेण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ.शेकडे, डॉ.आदमाने, डॉ. दुबे, डॉ.पुजदेकर, कोविड केअरच्या तज्ञ डॉ.डिकले, डॉ. तांबोळी, आरोग्य कर्मचारी पौळ, तिवारी, मोहसिन आदी उपस्थित होते.

बातमी जास्तीत जास्त शेअर करा….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!