नापिकीला कंटाळून धारूर शहरात शेतकऱ्याची आत्महत्या; सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक चौधरी यांचे निधन.

किल्लेधारूर दि.24 (वार्ताहर) धारूर येथील शेतकरी भगवान दशरथ चव्हाण (62) वर्ष यांनी नापिकीला कंटाळून शेतात सोमवारी रात्री उशीरा आत्महत्या (Suicide) केली. सदरील प्रकार मंगळवारी उघडकीस आला. या प्रकरणी मंगळवारी रात्री उशीरा धारूर (Dharur) पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यु म्हणून नोंद करण्यात आली आहे. तर शहरातील सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक गणेश शिवराम चौधरी (68) यांचे वृध्दापकाळाने मंगळवारी रात्री 9 वाजता निधन झाले.

(Farmer commits suicide in Dharur due to infertility; Retired Transport Controller Chaudhary passes away.)

धारूर येथील शेतकरी भगवान दशरथ चव्हाण (62) वर्ष यांनी आपले नापीक जमिनीत उत्पन्न होत नसल्याने आवरगाव शिवारातील इनाम शेत जमिनीत झाडाला गळफास घेऊन सोमवारी रात्री उशीरा आत्महत्या (Suicide) केली. हि घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी त्यांचे मोठे भाऊ प्रभाकर चव्हाण यांनी मंगळवारी रात्री उशिरा दिलेल्या खबरी वरून धारूर पोलीस (Police) स्टेशनला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

पुढील तपास पोलिस सहाय्यक पोलिस (Police) उपनिरिक्षक शिवाजी चव्हाण हे करत आहेत. मयत शेतकरी भगवान चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, पाच भाऊ असा परिवार आहे. मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांचे धाकटे बंधू तर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते गौतम चव्हाण यांचे चुलते होत.

किरण चौधरी यांना पितृशोक.
येथील एस.टी. आगारातील वाहक किरण चौधरी यांचे वडील सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक गणेश शिवराम चौधरी (62) यांचे मंगळवारी रात्री 9 च्या सुमारास वृध्दापकाळाने निधन झाले. चौधरी यांनी येथील धारुर बस आगारात अनेक वर्ष वाहक व नंतर वाहतूक नियंत्रक म्हणून सेवा केली. त्यांच्या पश्चात पत्नी, वाहक किरण चौधरी, नितिन चौधरी सुना नातवंड असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सितेची न्हानी परिसरातील स्मशानभुमीत बुधवारी सकाळी 10 वाजता अंत्यविधी करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे धारुर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!