बीड जिल्ह्यात पुन्हा शेतकरी आत्महत्या; केज तालुक्यात तरुण शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल.

केज दि.27 अॉक्टोंबर – अतिवृष्टीमुळे शेतातील गेलेले पिक, मुलांचे शिक्षण, संगोपन व बँकेचे कर्ज या सर्व आर्थिक विवंचनेतून केज (Kaij) तालुक्यातील जवळबन येथील तरूण शेतकरी बाळासाहेब गोवर्धन घाडगे (वय 32) याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आले आहे.

(Farmer suicide again in Beed district; The last step taken by a young farmer in Kaij taluka.)

आज (दि.27) रोजी सकाळी सहा वाजता गुंडुळी नावाच्या शेतात  घाडगे वस्ती येथील जालिंदर साधु जोगदंड सर्वे नंबर 187 मधील लिबांच्या झाडाला बाळासाहेब याने नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. वाढती महागाई, पावसामुळे शेतातील गेलेले पिक, मुलांचे शिक्षण, संगोपन व बँकेचे असलेले कर्ज या सर्व आर्थिक विवंचनेतुन शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.

घरातील तरूण कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन लहान मुले, एक मुलगी असा परिवार आहे. सदरील शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येमुळे जवळबन परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फटका बसला असून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या (Farmer suicide) घटना वाढल्या आहेत. दिवाळी (Dipawali) सण तोंडावर आलेला असताना शेतकऱ्यांच्या पदरी छदामही मदत पडली नसल्याने आत्महत्येचे सत्र सुरु असल्याचे दिसून येते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!