धारुर तालुक्यात पुन्हा शेतकरी आत्महत्या; तिसऱ्यांदा पेरणी करण्याची वेळ आल्यामुळे उचलले टोकाचे पाऊल…

किल्लेधारूर दि.1 अॉगस्ट- शेतात सलग दोनवेळा सोयाबीन पेरणी करून ही न उगवल्याने तिसऱ्यांदा बाजरी पेरली. परंतू यामुळे आलेल्या नैराश्यातून धारुर (Dharur) तालुक्यातील कारी येथील तरूण शेतकऱ्याने शेतात एका झाडास गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना आज रविवारी उघडकीस आली आहे.

(Farmer suicide again in Dharur taluka; When it came time to sow for the third time, the last step was taken …)

यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, तेलगाव पासुन जवळच असलेल्या कारी ता.धारूर येथील परमेश्वर सुंदरराव मोरे (वय 43) यांना चार साडे चार एकर शेती आहे. या शेतीत त्यांनी यंदा खरीपात सोयाबीन पीकाची पेरणी केली होती. यामध्ये जुनच्या प्रारंभी त्यांनी शेतात सोयाबीन पेरले होते. मात्र प्रारंभीच्या वेळी पीकाला समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरलेले सोयाबीन (Soybean) उगवलेच नाही. त्यामुळे परमेश्वर मोरे यांनी परत दुसऱ्यांदा सोयाबीन पेरले. परंतू दुसऱ्या वेळी जादा पाऊस झाल्याने ऊगवुन आलेले सोयाबीन (Soybean) पीक जळुन गेले. त्यामुळे मोरे यांनी परत तिसऱ्यांदा शनिवारी शेतात बाजरीची पेरणी केली.

एकाच शेतात यंदा तिसऱ्यांदा पेरणी केली. यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च झाला. त्यातच बँकेचे पीककर्ज (Crop loan) ही घेतले होते. ते कर्ज कशावर फेडायचे, शेतात झालेला खर्च, त्यातुन घर संसारासाठी लागणारा पैसा कुठून आणायचा. अशा आर्थिक विवंचनेने मोरे यांच्या डोक्यात घर केल्याने ते अस्वस्थ झाले होते. याच नैरश्यातुन शनिवारी शेतात बाजरी पेरल्या नंतर रात्री घरी न येता ते शेतातच थांबले. त्यानंतर ते रविवारी सकाळी शेतातील एका झाडास गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याच्या अवस्थेत आढळुन आल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

परमेश्वर मोरे या शेतकऱ्याने अशा प्रकारे नापीकीला कंटाळुन आत्महत्या केल्याने कारी व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात वृध्द आई, वडिल, पत्नी एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी दिंद्रुड पोलीस (Police) ठाण्यात आकस्मात नोंद करण्यात आली असुन पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक (API) प्रभा पुंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार वसंत नागरगोजे हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!