अखेर त्या शिक्षकाची परळीत आत्महत्या; रेल्वे समोर घेतली उडी.

परळी वैजनाथ दि.1 जुलै – केज तालुक्यातील पिंपळगाव येथील एका शिक्षकाने रेल्वे समोर उडी मारुन आत्महत्या (Suicide) केली आहे. चंद्रहास (पिंटू) उत्तम घोळवे या इसमाने बुधवारी दि.30 रोजी सायंकाळी 9 च्या सुमारास परळी जवळ रेल्वे समोर उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी बुधवारपासून सदरील शिक्षक बेपत्ता असल्याचे सोशल मिडियात (social media) पोस्ट वायरल झाल्या होत्या.
(Finally the suicide of that teacher in Parli; Jump in front of the Finally the suicide of that teacher in Parli; Jump in front of the train.
चंद्रहास उत्तम घोळवे वय – 45 (रा.पिंपळगाव ता.केज) येथील व्यक्ती बुधवारी दुपारी तीन वाजता केज येथून स्वतःच्या चारचाकी गाडीतून निघून गेले. परिवारातील सदस्यांनी शोधाशोध सुरु केल्यानंतर मोबाईलचे लोकेशन परळी येथे दाखवले. सोशल मिडियातून (social media) त्यांच्या पोस्ट वायरल झाल्या होत्या.
परळीतील नातेवाईकांनी येथे शोधाशोध घेतला असता येथील धर्मापुरी रोड, सिमेंट फॅक्टरी जवळ गाडी सापडली. पुढे रेल्वे पटरीवर आत्महत्या (Suicide) केल्याचे दिसून आले. चंद्रहास यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुले, एक भाऊ असा परिवार आहे.