अशी झाली धारुरात टिपू सुल्तान जयंती….

किल्लेधारूर दि.१७ (प्रतिनिधि) धारूर शहरामध्ये प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षी भारत देशाचे पहिले स्वातंत्र्यसेनानी टिपू सुलतान Tipu Sultan यांच्या जयंती निमीत्त किल्ले धारूर Dharur जयंती उत्सव समिती तर्फे आनलाईन व्याखानासह सर्व धर्माच्या गोरगरिबांना अन्नधान्य व किराणा साहित्य वाटप करुन साजरी करण्यात आली.
प्रतिवर्षी टिपू सुलतान Tipu Sultan जयंती निमीत्त व्याख्यान व विविध समाज उपयोगी कार्यक्रम धेऊन जयंती साजरी केली जाते. या वर्षी कोरोना प्रादुर्भाव असल्याने यंदा जयंती निमीत्त ऑनलाइन पध्दतीने व्याख्यान व अन्नधान्य व राशनचे साहित्य वाटप करुन जयंती साजरी करण्यात आली. सदर अन्नधान्य व राशनचे साहित्य वाटप टिपू सुलतान जयंती उत्सव समितीचे सदस्य सादिक ईनामदार, ॲड. सय्यद साजेद, नदीम मोमीन, अकरम जरगर, सय्यद रज्जाक, अकरम भाऊ, शेख सिद्दिक, शेख मोबीन, मुनीर सय्यद, ॲड. शादाब, शहबाज पठाण, इम्रान कादरी, सोहेल जरगर, गुलशन काजी, ओसामा जरगर, अजहर काजी, मुखीद जरगर, फारोख बागवान, फारोख जरगर, शेख ऐजाज, पठाण अजहर व धारूर Dharur शहरातील सर्व टिपु सुल्तान जयंती समितीचे सदस्य उपस्थित होते.