केजमध्ये अग्नितांडव… पाच दुकाने जळून खाक.

केज दि.22 डिसेंबर – केज जि.बीड येथे राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) रात्री भीषण आगीची घटना घडली असून पाच दुकाने आगीत जळून खाक झाली आहे. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले असून आगीचे कारण अद्याप समोर आले नाही.

(Fire in the Kaij … Five shops burnt down.)

केज (Kaij) शहरातील मंगळवार पेठ कॉर्नर जवळील महामार्गालगत असलेल्या दुकानास मध्यरात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास आग लागली. रात्रीची वेळ असल्याने आग कोणाच्या निदर्शनास न आल्याने आगीने (Fire) रौद्ररूप धारण केले. यात महामार्गालगत असलेल्या दुकांनांनी पेट घेतला.

या आगीत वामनराव जोगदंड यांचे भारत इलेक्ट्रीकल्स, बबन धस यांचे उत्तम उपहारगृह, महेश चौरे यांचे कृष्णा ॲटो गॅरेज, गंपतराव गवळी यांचे सोनाली ऑफसेट, राम शिंदे यांचे गोविंद जेन्टस पार्लर ही पाच दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यामध्ये मोठ आर्थिक नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आधीच कोरोना काळातील लॉकडाऊन, यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे व्यवसायिकांचे कंबरडे मोडलेले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे (Natural disasters) व ऊसतोड मजूरांच्या स्थलांतरामुळे बाजारपेठेत (Market) शुकशुकाट आहे. त्यात ही आगीची घटना घडली. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. आग लागण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!