भिषण अपघातात चार मित्रांचा मृत्यू… वाढदिवस साजरा करुन परतत असताना झाला अपघात

चंद्रपुरः दि.१६- वाढदिवसाची पार्टी करुन परततत असणाऱ्या मित्रांच्या कारचा चंद्रपुरात भीषण अपघात (accident) झाला. ट्रॅक्टरला दिलेल्या धडकेत कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला असून यात चौघांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी आहे. ज्या तरुणाचा वाढदिवस (Birthday) होता तो अपघातात बचावला असला तरी आपल्या चार मित्रांचा मृत्यू पाहण्याची दुर्दैवी वेळ त्याच्यावर आली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत.

चंद्रपूर-मूल मार्गावरील अजयपूर भागात मंगळवारी रात्री हा अपघात (accident) झाला. मृतांमध्ये दोन तरुण आणि दोन तरुणींचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, योग गोगरी (२३) याचा वाढदिवस (birthday) साजरा करण्यासाठी दर्शना उधवाणी (२५), प्रगती निमगडे (२४), मोहम्मद अमन (२३) आणि स्मित पटेल (२५) या चार मित्रांसह योग गोगरी हॉटेलमध्ये गेले होते. वाढदिवस साजरा करुन घरी परतत असतानाच अजयपूर येथे त्यांचा कारचा भीषण अपघात झाला. ट्रॅक्टर अचानक शेतातून मुख्य मार्गावर आल्याने भरधाव वेगात असलेली कार ट्रॅक्टरवर धडकली आणि हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. अपघातानंतर तेथील स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मुलांना बाहेर काढलं. मात्र यामधील चौघांचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावावर शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!