व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी चार पथके; धडक मोहिमेचे नियोजन

किल्लेधारूर  दि.13 मार्च- कोरोनाचा (Corona) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शहरातील व्यापाऱ्यांना अँटीजन (Antigen) टेस्ट बंधनकारक करण्यात आलेली आहे.  15 मार्च पर्यंत व्यापाऱ्यांनी टेस्ट केली नाही तर त्यांची दुकाने सील करून त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात करण्यात येईल असा इशारा तहसील कार्यालयाने दिला आहे  या कारवाईसाठी शहरात चार पथके नेमण्यात आली असून ही पथके शहरात फिरून ही कारवाई करणार आहेत. यामुळे व्यापारी वर्गात खळबळ माजली आहे.

(Four squads for action against traders; Direct campaign planning)

कोरोनाचा (Corona) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरांमधील सर्व व्यापाऱ्यांना अँटीजन (Antigen) टेस्ट करणे बंधनकारक करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रविंद्र जगताप (Collector Ravindra Jagtap) यांनी घेतला आहे. 15 मार्च नंतर कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे. या आदेशाच्या अंमलबजावणी साठी येथील महसुल, नगर परिषद व पोलिस (Police) प्रशासनाने चार पथके तयार करुन धडक मोहिमेचे नियोजन केले आहे.

15 मार्च पूर्वी सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या अँटीजन टेस्ट करून घ्याव्यात व प्रशासनास सहकार्य करावे नसता 16 मार्च पासून अँटीजन टेस्ट केली नसणाऱ्या व्यापाऱ्यांची दुकाने सील करून आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही तहसील कार्यालयाच्या वतीने तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी दिला आहे.

या कारवाईसाठी शहरात चार पथके नेमण्यात आली असून यामध्ये मंडळ अधिकारी नजीर कुरेशी, मंडळ अधिकारी भरत घोळवे,  नगरपरीषदेचे लेखा अधिकारी नितीन इजाते  यांच्या नेतृत्वाखाली ही चार पथके स्वतंत्रपणे नेमून दिलेल्या विभागात काम करणार आहेत. त्यामुळे या कारवाईपासून दूर राहण्यासाठी व्यापाऱ्यांनी आपल्या अँटिजन टेस्ट करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार वंदना शिडोळकर, नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी, मुख्याधिकारी नितिन बागुल सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरेखा धस यांनी केले आहे.

दरम्यान, आज जिल्हाधिकारी रविंद्र जगताप (Collector Ravindra Jagtap) यांनी नवीन आदेश जारी करत सांयकाळी 7 ते सकाळी सातपर्यंत सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन पोलिस (Police) प्रशासनाने केले आहे. सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरेखा धस यांनी शहरात याबाबत आवाहन करत मास्क वापरण्याची ताकीद दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!