पैशाचा पाऊस पाडतो म्हणून पाच लाखांची फसवणूक; बीड जिल्ह्यातील आणखी एका प्रकाराने खळबळ.

बीड दि.22 फेब्रुवारी – पैशाचा पाऊस पाडून गुंतवलेली रक्कम पाच पट करून देण्याचे आमिष दाखवून एका महाठग बापलेकांनी व्यापाऱ्यास दाखवले. पैशाचा मोह झाल्याने व्यापारी पाच लाखाला बुडाल्याचा प्रकार बीडच्या (Beed) परळीत (Parli) समोर आला आहे.

( Fraud of five lakhs as money rains; Another kind of excitement in Beed district. )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंगद अंकुशराव थोरात असे परळीत फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. अंगद थोरात यांचे परळीत किराणा दुकान आहे. दाखवलेल्या आमिषाला भुलून व्यापाऱ्याने चक्क पाच लाखांची रक्कम त्या महाठगांना दिली. मात्र त्यानंतर पैशाचा पाऊसचं पडला नाही आणि दिलेली रक्कमही परत मिळाली नाही.

अंगद थोरात यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून, थर्मलचे काम घेणारा गुत्तेदार प्रेमसागर उर्फ बाळासाहेब बापूराव जोगदंड याचा मुलगा प्रशांत याच्यासोबत अंगद यांची एका मित्राच्या माध्यमातून ओळख झाली. व्यापार वाढविण्यासाठी माझे वडील भविष्यात मदत करतील. विश्वास बसावा म्हणून मोबाईलवर पैशाचा पाऊस पडतानाचा व्हिडीओ देखील दाखवला. ‘तुझ्या जवळील पैशाच्या पाच पट पैसे करून दाखवतील’ असे आमिष त्याने दाखवले.

याला प्रशांतचे वडील प्रेमसागर यानेही खरं असल्याच सांगितलं. या बापलेकाच्या भूलथापांना बळी पडून, मागील वर्षी दसऱ्याच्या दोन दिवसांपूर्वी अंगदने पाच लाख रुपये त्या बापलेकाकडे सुपूर्द केले. ‘हे पैसे आम्ही महाराजांना पोहोचते करतो, आठ दिवसात ते तुझ्या घरी येऊन पूजा करतील आणि पैशाचा पाऊस पाडून याच्या पाच पट पैसे तुला करून देतील’ असे त्यांनी सांगितले.

मात्र महाराज आलेच नाहीत. महाराजांना बोलवण्याबाबत अंगदनी अनेकदा जोगदंडकडे विचारणा केली. परंतु प्रत्येक वेळी ते वेगवेगळी करणे सांगत टाळत राहिला. अखेर शंका आल्याने अंगदने त्यांना महाराजाचा पत्ता आणि रक्कम दिल्याचे बँक खाते (Bank account) विचारले, असता त्यांनी पुन्हा उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने रक्कम परत करण्याची मागणी करूनही जोगदंड बापलेकांनी त्यांचे पैसे परत केले नाहीत. अशी तक्रार अंगद थोरात यांनी फिर्यादीतून केली.

दरम्यान याप्रकरणी थोरात यांच्या फिर्यादीवरून ( complaint ) प्रेमसागर जोगदंड आणि प्रशांत जोगदंड या दोघांवर संभाजीनगर पोलीस (Police) ठाण्यात फसवणूक (Fraud) आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!