केजच्या कोल्ड ब्लडेड मर्डरचे आरोपी फरार; हत्या करुन आत्महत्येचा बनाव.

केज दि.13 सप्टेंबर – प्रेमप्रकरणात अडसर ठरणाऱ्या पतीचा काटा काढून मुलाला अनुकंपा तत्त्वावर नोकरी लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या केज (Kaij) तालुक्यातील कोल्ड ब्लडेड मर्डरचे (cold blooded murder) आरोपी अद्याप फरार आहेत. पतीची हत्या (Murder) करुन आत्महत्या (Suicide) दाखवून सिनेस्टाइल काटा काढल्याचा सदरील धक्कादायक प्रकार मांगवडगाव (ता. केज) येथे 11 रोजी समोर आला होता.

(Fugitive accused of Kaij’s cold-blooded murder; Pretending to commit suicide by murder.)

मांगवडगाव शिवारात तीन महिन्यांपूर्वी विहिरीत एसटी बसचालकाचा मृतदेह आढळून आला होता. न्यायालयीन आदेशावरून पत्नी, प्रियकर व मुलावर खुनाचा गुन्हा नोंद झाला. भीमराव रंगनाथ खराटे (52, रा. भोगजी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) असे मयताचे नाव आहे. ते एसटी महामंडळात चालक पदावर कार्यरत होते. 29 मे 2021 रोजी मांगवडगाव (ता. केज) शिवारातील धनराज थोरात यांच्या शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह (Dead Body) आढळून आला होता. ओळख पटल्यानंतर मृतदेह नातेवाइकांकडे दिला.

या प्रकरणात तेव्हा युसूफवडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती. दरम्यान, मयत भीमरावचे बंधू बालाजी रंगनाथ खराटे यांना पत्नी, तिच्या प्रियकरावर व मुलावर संशय होता. त्यांनी त्यांच्याविरुध्द तक्रार देण्याचा प्रयत्न केला, परंतु तेव्हा पोलिसांनी (Police) गुन्हा नोंदवून घेतला नाही. त्यामुळे शेवटी त्यांनी न्यायालयात धाव घेतली. केज येथील न्यायदंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले.

राधाबाई खराटे व महादेव ऊर्फ बबन खराटे यांच्यात प्रेमसंंबंध होते. मात्र, यात पती भीमराव याचा अडथळा ठरत होता. शिवाय त्याला संपविल्यानंतर एसटी महामंडळातील सेवा कालावधीचे पैसे मिळतील तसेच मुलगा सिध्देश्वर यास अनुकंपा तत्त्वावर नोकरीला लावता येईल, यामुळे खून केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

त्यानुसार 11 रोजी रात्री बालाजी रंगनाथ खराटे यांच्या तक्रारीवरून मयत भीमरावची पत्नी राधाबाई भीमराव खराटे (48), प्रियकर महादेव ऊर्फ बबन अच्युत खराटे (40) व मुलगा सिध्देश्वर भीमराव खराटे (28, सर्व रा. भोगजी ता.कळंब) यांच्याविरुध्द युसूफवडगाव पोलिस ठाण्यात (Police station) खुनाचा गुन्हा नाेंदविण्यात आला. आरोपी फरार असून तपास सहायक पोलिस निरीक्षक (Assistant Police Inspector) विजय आटोळे करत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!