घात-अपघात

हृदयद्रावक … एकाच घरातील तिघांचा मृत्यू; मुलाच्या मृत्युच्या धक्क्याने आज्जीसह वडीलांचाही मृत्यू.

मंठा दि.11 मे – मंठा (जि. जालना) येथील एका तरुण मुलाचा रेल्वेत प्रवास करीत असताना ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्याच दिवशी आजीचा मृत्यू झाला तर दशक्रिया करताना वडीलाचांही मृत्यु झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. नामदेव नारायण वाठोरे असे वडिलाचे नाव आहे तर राहुल नामदेव वाठोर मुलाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, मंठा येथील नामदेव नारायण वाठोरे यांचा मुलगा राहुल दि 4 एप्रिल रोजी कामावर जात असताना त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या धक्क्यामुळे त्याचा रेल्वेतच मृत्यू झाला. इकडे वायोमानानुसार वडीलांची तब्येत बिघडली होती. त्यांचेवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मुलाच्या अंत्यविधीसाठी वडील नामदेव यांना गावी आणण्यात आले.

याच दिवशी राहुलची आजी कलाबाई यांचाही वृध्दापकाळाने मृत्यू झाला. या घटनेने आजारी असलेले नामदेव खचले. दि.10 मे मंगळवार रोजी दशक्रिया सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे. एकाच कुटूंबातील तीन व्यक्तींचा अवघ्या दहा दिवसात मृत्यू झाला. मयत राहुल यांना पत्नी, दोन मुले आहेत. एकाच घरातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.

नामदेव वाठोरे यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. दोन मुले औरंगाबादला काम करतात मोठा मुलगा कचरू औरंगाबादला राहतो. तर राहुल जालना येथे पेंटिंगचे काम करत होता. वाठोरे कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

( Heartbreaking … death of three in the same house; The death of the father as well as the grandmother due to the shock of the death of the child. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!