माजलगाव तालुक्यात गॅसचा स्फोट ; तीन घर जळून खाक

माजलगावः दि.२५(प्रतिनिधी)- माजलगाव (Majalgaon) तालुक्यातील मोगरा येथील शिवाजी नगरतांडावर गॅसचा स्फोट (Gas explosion) होवून तीन घर जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कसलिही जिवितहानी झाली नसली तरी तीन घर जळून खाक झाली आहेत.
(Gas explosion in Majalgaon taluka; Burn down three houses)
माजलगाव (Majalgaon) तालुक्यातील मोगरा गावा जवळ असणाऱ्या शिवाजी नगरतांडा येथे घरगुती गॅसला अचानक आग लागली. गॅसला लागलेल्या आगीने काही वेळातच रूद्र रूप धारण केले. यामुळे शेजारी असलेल्या घरांनी पेट घेतला. यात काही मिनिटात प्रकाश पवार, अशोक पवार, विकास पवार या तिन्ही भावाचे घर भस्मसात होवून मोठे आर्थिक नुकसान झाले. यात कसल्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.
माजलगाव नगर परिषदच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या आगीचे तहसील कार्यालया कडून घरचे पंचनामे करण्यात आले. दरम्यान या आगीत तिन्ही भावाचे घरे व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले असून आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.