अंबाजोगाई, बीड, आष्टी, केज पाठोपाठ गेवराईची चिंता वाढली; आज बीड जिल्ह्यात 1047 कोरोना बाधित.

बीड दि.21 एप्रिल- आज बीड (Beed) जिल्ह्यातील 4576 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 1047 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3529 जण निगेटिव्ह आली आहेत. दरम्यान, जिल्हाभर कोरोना संसर्गाचा वेग कमी करण्यासाठी नवनवीन उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
(Gevrai’s anxiety increased after Ambajogai, Beed, Ashti, Kaij; Today 1047 corona infected in Beed district.)
आज पंचेचाळिसाव्या दिवशी बीड तालुक्यात 223 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात आज सर्वाधिक अंबाजोगाई तालुक्यात 176, आष्टी तालुक्यात 124 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 43 तर केजमध्ये 125 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-223, अंबाजोगाई-176, आष्टी-124, धारुर-43, गेवराई-101, केज-125, माजलगाव-48, परळी-90, पाटोदा-51, शिरुर-35, वडवणी-31 अशी आहे.
कोविड-19 (covid-19) चा जिल्ह्यात उद्रेक वाढला आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या वाढतच आहे. आज राज्य सरकारने नवीन आदेशाद्वारे अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकाने, फळ व भाजी विक्रेते, मटन चिकन व बेकरीच्या दुकांनाना सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा दिली आहे.
दरम्यान, राज्यात 62 हजार नवीन रुग्ण.
काल राज्यात 60 हजारापेक्षा कमी नवीन कोरोना रुग्ण (Corona Positive) आल्याचे दिलासादायक चित्र होते. मात्र, पुन्हा मंगळवारी 62 हजार 97 नव्या रुग्णांची भर पडली. दिवसभरात 54 हजार 224 रुग्ण कोरोनामुक्त झाले. गेल्या 24 तासांत तब्बल 519 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात सहा लाख 83 हजार 856 उपचाराधीन रुग्ण आहेत.