माझं गाव

सुवर्णसंधी … धारूर येथे गुरुवारी रोगनिदान, शस्त्रक्रिया व दंतचिकित्सा शिबीर; तज्ञांकडून धारुरमध्येच होणार शस्त्रक्रिया.

किल्ले धारूर दि.8 मार्च – केंद्र पुरूस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भव्य रोगनिदान, शस्त्रक्रिया व दंतचिकीत्सा शिबीराचे आयोजन 10 मार्च रोजी ग्रामीण रुग्णालय धारूर येथे करण्यात आले असून या शिबीराचा शुभारंभ आ. प्रकाशदादा सोंळके (Prakash Solanke) यांचे हस्ते करण्यात येणार आहे. या शिबीराचा लाभ या भागातील सर्व गरजूनी घ्यावा असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. चेतन आदमाने व तालूका आरोग्य आधिकारी डॉ.शहाजी लोमटे यांनी केले आहे.

( Golden Opportunity … Diagnosis, Surgery and Dentistry Camp at Dharur on Thursday; Specialists will perform the surgery in Dharur itself. )

केंद्र पुरुस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत धारूर (Dharur) परिसरातील जनते करीता आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य शस्त्रक्रिया व दंत चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दि.10 मार्च गुरुवार रोजी धारूर ग्रामीण रुग्णालयात शिबिर होत आहे.

या शिबीराचे उदघाटन आ. प्रकाशदादा सोंळके यांचे हस्ते करण्यात येणार आहे. या शिबीरामध्ये ज्या रुग्णांना शस्त्रक्रियाचे गरज आहे. परंतु ते जिल्हा स्तरावर जावु शकत नाही. त्यांच्यासाठी ग्रामीण रुग्णालय, धारूर येथेच पात्र रुग्णाच्या शस्त्रक्रिया (Surgery) केल्या जातील.

शिबिराचे वैशिष्ट्ये…
या शिबिरात स्त्रीरोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, शस्त्रक्रिया तज्ञ, दंतरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, जनरल फिजिशियश, मानसोपचार तज्ञ, कान, नाक, घसा तज्ञ, त्वचारोग तज्ञ, आयुर्वेद तज्ञ, नेत्ररोग तज्ञ उपस्थित राहणार आहेत. यावेळी मोफत तपासणी व उपचार होणार आहेत.

या शस्त्रक्रिया होणार…
अंडवृध्दी (हायड्रोसिल), हार्निया, अपेंडिक्स, लहान मुलांमधील टंग टाय जिभेवरील शस्त्रक्रिया, शरीरावरील सर्व प्रकारच्या गाठीच्या शस्त्रक्रिया, दंत शस्त्रक्रिया, नेत्र शस्त्रक्रिया, कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया, सिझिरियन प्रसुती शस्त्रक्रिया. या शिबिरात गर्भाशय व स्तनाच्या गाठी, रक्तदाब, मधुमेह, असंसार्गिक आजार, इ.सी.जी. एक्स रे, सोनोग्राफी, रक्त व लघवी तपासणी, नेत्र तपासणी व उपचार मोफत करण्यात येणार आहे.

तरी जनतेने या सुवर्ण संधीचा आवश्य लाभ घ्यावा. तसेच शस्त्रक्रिया संबंधी माहितीसाठी डॉ.परवेज शेख 9890890024 यांच्या संपर्क साधावा असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. चेतन आदमाने व तालूका आरोग्य अधिकारी डॉ. शहाजी लोमटे यांनी केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!