आज धारुर तालुक्यात कोरोनाचा भडका; तिसऱ्यांदा आली दोन अंकी संख्या

किल्लेधारूरः दि.४ सप्टेंबर- काल पाठवलेल्या ३० पैकी १३ जनांचे व ॲन्टीजन टेस्टमध्ये ३ असे १६ अहवाल पॉझिटीव्ह आली आहेत. गेल्या तीन दिवसांत मिळालेल्या दिलास्यानंतर तालुक्याची संख्या अचानक वाढली आहे. तालुक्याची आजची संख्या तिसऱ्यांदा दोन अंकी दिसुन आली.
तालुक्यातून गेल्या ३५ दिवसात कोरोना पॉझिटीव्ह असणारे रुग्ण दररोज आढळून येत आहेत. गेली तीन दिवस कमी असलेली संख्या आज एकाच वेळी १६ रुग्णांची भर पडून अचानक वाढली आहे. हि आजवरची तिसरी सर्वाधिक संख्या आहे. काल धारुर मधून ३० लोकांचे थ्रोट स्वॅब तपासणीला पाठवण्यात आली होती. यापैकी १३ पॉझिटीव्ह आली आहेत. तर ३ जन ॲन्टीजन टेस्टमध्ये पॉझिटीव्ह आढळली आहेत. यापैकी दोन शहरातील काशिनाथ चौक व संभाजीनगर भागातील आहेत. इतर रुग्णांत आसरडोह ४, तेलगाव १, तांदळवाडी १, काडी वडगाव १, भोपा ३, जागिरमोहा १, ढगेवाडी १, कारी १, चाटगाव १ असे ३ ॲन्टीजन मिळून १६ पॉझिटीव्ह आली आहेत. रात्री उशिरा बाहेरुन येणाऱ्या पोर्टल वरील नोंदीनुसार संख्येत बदल होवू शकतो.