धारुर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खूषखबर; पोकरा योजनेत 65 लाख 63 हजारांचा निधी.

किल्ले धारूर दि.25 फेब्रुवारी – राज्य शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत पोकरा योजनेत तालूक्यातील 23 गावांचा समावेश आहे. या गावात तिसऱ्या चौथ्या टप्प्यातील कामे सुरू आहेत. या कामांना कृषी विभागाने विविध कामाना 65 लाख 63 हजार रुपयाचे अनूदान देण्यात आले असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वर्ग होणार आहेत.
( Good news for farmers in Dharur taluka; Fund of 65 lakh 63 thousand in POCRA scheme. )
नानाजी देशमूख कृषी संजिवनी योजनेचे राज्य वित्त विशेषज्ञ तुळशीदास सोंळके व तालूका कृषी कार्यालयाच्या पाठपूराव्यामुळे हा निधी प्राप्त झाला असून शेतकऱ्यांनी आपल्या योजना वेगाने पुर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
धारूर तालूक्यात कृषी विभागाचे पोकरा योजनेत (POCRA scheme) 23 गावाचा समावेश असून गेल्या तीन वर्षा पासून विविध कृषी योजना शेती प्रगतीच्या दृष्टीने या गावातील शेतकऱ्यांनी राबवल्या. या योजनेत शासना कडून मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येते. फेब्रुवारी महिन्यात पोकरा योजने अंतर्गत राज्य कृषी विभागाने ( Department of Agriculture ) तालूक्यासाठी 65 लाख 63 हजार रुपये अनूदान उपलब्ध झाले.
कोणत्या कामासाठी किती निधी ?
सामूहिक शेततळ्यासाठी 1 लाख 10 हजार, रुपये ठिंबक सिंचनासाठी 20 लक्ष 93 हजार, यांत्रिकीकरणासाठी 2 लक्ष रुपये, शेती शाळेसाठी 39 हजार रुपये, फळबाग लागवडी साठी 1 लाख 3 हजार रुपये, शेततळे व वैयक्तिक साठी 9 लाख 36 हजार रुपये, वीज उत्पादनासाठी 1 लाख 36 हजार, रेशीम उद्योगासाठी 3 लाख 14 हजार रुपये, तुषार संचासाठी 25 लाख 41 हजार रुपये, मोटर पंपासाठी 58 हजार रुपये असे एकुण 65 लक्ष 63 हजार रुपयाचे अनुदान पोकरा योजनेअंतर्गत धारुर (Dharur) तालुक्यात उपलब्ध झाले आहेत.
हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी नानाजी देशमूख कृषी संजीवनी योजनेचे राज्य वित्त विशेषज्ञ तुळशीदास सोंळके यांनी विशेष प्रयत्न केले. कृषी विभागा कडून शेतकऱ्यांनी परीपूर्ती केल्यास तात्काळ हे अनूदान वितरीत केले जात असून या गावच्या शेतकऱ्यांनी तात्काळ लाभ घ्यावा असे आवाहन तालूका कृषी अधिकारी (Taluka Agriculture Officer) एस. डी. शिनगारे यांनी केले आहे.