‘ब्रेक द चेन’ मार्गदर्शक सूचनांमध्ये आरोग्य विभागाने केली सुधारणा; पहा काय आहे नवीन सुधारणा.

मुंबई दि.16 अॉगस्ट – कालपासून राज्यात निर्बंधात मोठ्या प्रमाणात शिथिलता देण्यात आलेली आहे. राज्यातील 18 वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा अथवा महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोना निर्बंधासाठी असलेल्या ‘ब्रेक द चेन’ (Break the chain) अंतर्गत मार्गदर्शक सूचनांमध्ये (Guidelines) आरोग्य विभागाने Health department) आज दि.16 सोमवारी ही सुधारणा केली आहे.
(Improvements made by the Department of Health in the ‘Break the Chain’ guidelines; See what’s the new update.)
राज्यात 18 वर्षाखालील मुला-मुलींच्या लसीकरणास (Vacccination) अद्याप सुरूवात न झाल्याने 18 वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेश देताना वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड (Aadhar), पॅनकार्ड (Pan card) किंवा वयाचा उल्लेख असलेले शाळा आणि महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक असणार आहे, असे आज निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व शॉपिंग मॉल्स (Shopping Malls) रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये काम करणारे कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या (Corona vaccine) दोन्ही मात्रा पूर्ण केल्याचे आणि दुसरी मात्रा घेऊन 14 दिवस पूर्ण झाल्याचे लसीकरण प्रमाणपत्र मॉलच्या प्रवेशद्वारावर दाखविण्याबाबत यापूर्वीच निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे.