कोरोंना विशेष

मानव सेवा करत वृक्षारोपण जोपासण्यासाठी पाणी देऊन केली मदत

किल्लेधारुर दि. १३(वार्ताहर)किल्ले धारुर शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुरज कोमटवार यांनी समाजिक बांधिलकी जोपासत शहरातील वार्ड क्र.३ मध्ये मोफत पाणी वाटप व सार्वजनिक ठिकाणी च्या वृक्षांना ही पाणी टाकण्यास सुरुवात केली आहे. ६ एप्रिल रोजी या मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला असुन लाॅकडाऊन जो पर्यंत चालु आहे तो पर्यंत मोफत पाणी देणार आहेत त्याच बरोबर वैकुंठ भूमी या ठिकाणी एक संस्थेने वृक्ष लावून ते संवर्धन करत आहे त्याच्या मदतीला साठी माझ्याकडून पाण्याची टँकर मदत करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुरज कोमटवार यांनी सांगितले आहे.

देशावर कोरोना व्हायरसचे संकट आले आहे. त्यामुळे गरिबाच्या हाताला काम नाही म्हणुन लॉकडाऊनच्या काळात माधव तात्या निर्मळ यांच्या वतीने शहरातील गरजु लोकांना जीवनावश्यक वस्तुच्या किटचे वाटप करण्यात आले होते. त्याचाच आदर्श घेऊन माधव निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील वार्ड क्र.३ जरगर गल्ली, कोमटवार गल्ली, मोमीन गल्ली, झारे गल्लीत मोफत पाणी वाटप करण्यात येत आहे. त्याच बरोबर आता वैकुंठ भूमी सार्वजनिक ठिकाणी सामाजिक संस्थेने लावलेल्या वृक्षांना पाणी देण्यात आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!