ग्रामपंचायत निवडणूकीचे बिगुल वाजले ; धारुर तालुक्यातील या 31 ग्रामपंचायतचा समावेश.

51 / 100

किल्लेधारूर दि.9 नोव्हेंबर – ग्रामपंचायत निवडणूकीचे बिगुल वाजले महाराष्ट्रात गाव-खेड्यापासून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापायला सुरुवात होणार आहे. राज्यातल्या 7751 ग्रामपंचायतीचा निवडणूक (election) कार्यक्रम जाहीर झाला आहे. अॉक्टोंबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 7751 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. धारुर तालुक्यातील 31 ग्रामपंचायतीचा यात समावेश आहे.
( Gram panchayat election bugle sounded; This includes 31 Gram Panchayats in Dharur Taluka. )

कसा असेल निवडणूक (election) कार्यक्रम….
18 नोव्हेंबर 2022 रोजी तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील.
28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा कालावधी
5 डिसेंबर अर्जांची छाननी
7 डिसेंबर उमेदवारी मागे घेण्याची मुदत व अंतिम उमेदवार यादी जाहीर
(दुपारी तीन वाजेपर्यंत)
18 डिसेंबर रोजी मतदान
20 डिसेंबर मतमोजणी व निकाल
23 डिसेंबर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिसुचना प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिवस.

धारुर तालुक्यातील या 31 ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी…
बीड (Beed) जिल्ह्यात एकुण 704 ग्रामपंचायत तर धारुर (Dharur) तालुक्यातील 31 ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यात कारी, संगम, मैंदवाडी, खोडस, चोंडी, चाटगाव, घागरवाडा, तांदळवाडी, वाघोली, गांजपुर, चिंचपूर, कोळ पिंपरी, तेलगाव, बोडखा, पांगरी, आवरगाव, आंबेवडगाव, आम्ला निम्ला, फकीर जवळा, उमरेवाडी, चोरांबा, आरणवाडी, मुंगी, देवठाणा, देवदहीफळ, कोयाळ, पहाडी दहीफळ, आसरडोह, अंजनडोह, गांवदरा व असोला या गावांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!