शिरुरमध्ये वृध्दाचा खून; चिठ्ठीतून खूनाचे सत्र सुरुच ठेवण्याची धमकी.

बीड दि.7 मे – शिरुर तालुक्यातील आनंदगाव येथे एका 65 वर्षीय वृद्धाची पहाटे अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्र पाठीत भोसकून खून (Murder) केला. मयत वृद्धाजवळ एक चिठ्ठी सापडली असून या चिठ्ठीत, माझ्या बायकोचा खून झाला आहे. जोपर्यंत बायकोच्या खुनाचे आरोपी जेरबंद होत नाहीत तोपर्यंत खुनाचे सत्र सुरूच राहणार असल्याची धमकी देण्यात आली आहे.
शिरूर तालुक्यातील आनंदगाव परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर उन्हाळी पीक बहरली आहेत. शेतकरी हरिण आणि रानडुक्करांचा त्रास असल्यामुळे पिकाची राखण करतात. कुंडलिक सुखदेव विघ्ने (65) हे पिकांचे रक्षण करण्यासाठी आपल्या शेतात रात्रीच्या जागरणासाठी गेले होते. आज (दि.7) शनिवारी सकाळी कुंडलिक विघ्ने यांचा मुलगा वडील घरी आले नाहीत म्हणून शेतात बघण्यासाठी गेला तर वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले.
मयत कुंडलिक विघ्ने यांच्या पाठीत धारदार शस्त्राने वार केलेले होते. मयत वडिलांच्या शेजारी त्यांना एक चिठ्ठी सापडली. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली. आणि आनंदगावच्या या खुनामुळे शिरुर तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेहाच्या शेजारी असणारी चिठ्ठी ताब्यात घेतली. या खूनामुळे परिसरात घबराट पसरली आहे.
( Murder of an old man in Shirur; The letter threatens to continue the murder session. )