आणखी एक लाचखोर अटकेत… 10 हजारांची लाच स्विकारताना ग्रामसेवक चतूर्भुज; दुसरी मोठी कारवाई.

कळंब दि.20 जुलै – चौदाव्या वित्त आयोग निधीतून भूमिगत नाली बांधकामाच्या प्रस्तावात बदल करून नवीन प्रस्ताव दाखल करण्याच्या कामासाठी दहा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तालुक्यातील हावरगाव येथील ग्रामसेवकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अटक केली. महेश औदुंबर शिंगाडे (42) असे अटक केलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. काल परंडा येथे 40 हजारांची लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यास अटक केल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील ही दुसरी मोठी कारवाई आहे.

(Gramsevak arrested accepting a bribe of Rs 10,000; Another big action.)

याबाबत लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून माहिती देण्यात आली, तक्रारदाराने हावरगाव ग्रामपंचायत अंतर्गत भूमिगत नाली बांधकामाचा पूर्वी तयार करण्यात आलेल्या प्रस्तावात बदल करून नवीन प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पंचायत समितीकडे पाठवण्याची मागणी ग्रामसेवक महेश शिंगाडे यांच्याकडे केली.

याकामासाठी ग्रामसेवक यांनी नाली बांधकामाच्या एकूण निधीच्या 15 टक्के व सुरवातीस 10 हजार रुपयांची लाचेची मागणी तक्रारदारकडे केली. यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचेची 10 हजार रुपये रक्कम कळंब शहरातील लता मंगेशकर शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चहाच्या हॉटेल येथे स्विकारल्याने ताब्यात घेवुन त्यांचे विरुध्द कळंब पोलिसात (Police) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक मारुती पंडीत, लाचलुच प्रतिबंधक विभागाचे (Anti-Corruption Bureau) औरंगाबाद पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक हुलगे, पोलीस अंमलदार इफत्तेकार शेख, पांडूरंग डंबरे, सिध्देश्वर तावसकर, अर्जुन मारकड यांनी केली. कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करुन दिल्या बद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलूच प्रतिबंधक विभागाशी (ACB) संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!