धारुर तालुक्यात लसीकरणाला उत्तम प्रतिसाद; राहिल्या एवढ्याच लसी शिल्लक.
अॉनलाईन नोंदणीच्या अपॉइंटमेंटमुळे वेग मंदावला

किल्लेधारूर दि.6 मे – धारुर शहरात नगरेश्वर मंदिर मंगल कार्यालयात गुरूवारी 6 मे रोजी लसीकरण करण्यात आले. तर तालुक्यातील ग्रामीण भागात भोगलवाडी, मोहखेड व रुईधारुर प्राथमिक आरोग्य केंद्र या तीन ठिकाणी लसीकरण (Vaccination) मोहिम घेण्यात आली. या चार केंद्रावर एकुण 1966 जणांना लसीचा डोस देण्यात आला. शहरात आज सुरु झालेल्या 18 ते 44 वयोगटातील लसीला मात्र अॉनलाईन नोंदणीत (Online Registration) अपॉइंटमेट नसल्याने ब्रेक लागला.
(Great response to vaccination in Dharur taluka; That’s all the vaccine left.)
शहरातील नगरेश्वर मंदीर मंगल कार्यालयात 45 वर्षावरील नागरिकांना कोविशिल्ड (Covishield) लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला. यात पहिला डोस 270 व दुसरा डोस 50 लोकांना देण्यात आला आहे. तर याच केंद्रावर 18 ते 44 वयोगटातील लोकांना कोव्हॕक्सिन (Covaxin) लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. यात अॉनलाईन नोंदणीतून अपॉइंटमेट मिळालेल्या 91 जणांना लस देण्यात आली.
तालुक्यातील भोगलवाडी लसीकरण (Vaccination) केंद्रावर 530, मोहखेड केंद्रात 550 व रुईधारूर केंद्रावर 465 लोकांना लस देण्यात आली. ग्रामीण भागात केवळ 45 वर्षांवरील लोकांचे लसीकरण करण्यात आले. या तिन्ही केंद्रावर प्रत्येकी 600 डोस मिळाली होती. या केंद्रावर सकाळी 10 ते 5 यावेळेत लसीकरण करण्यात आले. ग्रामीण भागातही लसीकरणासाठी लोकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.
तालुक्यातील सर्वच लसीकरणाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने सामाजिक अंतर पाळण्याच्या नियमाचा बोजवारा उडाला. 18 ते 44 वयोगटातील अनेक युवकांची अॉनलाईन नोंदणी होवूनही वेळेचे शेड्युल नसल्याने लसीकरण होवू शकले नाही. या वयोगटातील केवळ 91 लोकांचेच लसीकरण झाले. यामुळे नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. यापुढे लसीकरणाकडे लोक पाठ फिरवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आरोग्य विभागाने सदरील बाब गांभीर्याने घेण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरातील लसीकरण केंद्रावर वसुंधरा मित्र मंडळाच्या सदस्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले.
प्राप्त व शिल्लक लसीचे डोस
धाररु शहर प्राप्त खर्च शिल्लक
कोविशिल्ड – 800 330 470
(Covishield) (45 वर्षा पुढील)
कोवॕक्सिन – 1500 91 1409
(Covaxin) (१८ ते ४४ वयोगट)
भौगलवाडी – 600 530 70
मोहखेड – 600 550 50
रुईधारुर – 600 465 135
उर्वरित डोसचे लसीकरण सलग उद्या दुसऱ्या दिवशी करण्यात येणार आहे. 18 ते 44 वयोगटातील लोकांनी अॉनलाईन नोंदणीकरुन (Online Registration) अपॉइंटमेंट घ्यावी. अपॉइंटमेंट असल्याशिवाय लसीचा डोस देण्यात येणार नाही, यामुळे अशा लोकांनी गर्दी करु नये असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती डिकले व वैद्यकीय अधिक्षक डॉ. चेतन आदमाने यांनी केले आहे.