छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयतीसाठी मार्गदर्शक सुचना; पहा काय आहेत नियम.

बीड दि.15 फेब्रुवारी – संपुर्ण राज्यात येत्या 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जंयती साजरी होत आहे. या निमित्ताने राज्य शासनाच्या निर्देशानुसार बीड ( Beed ) जिल्हा प्रशासनाकडून नवीन मार्गदर्शक सुचना जाहिर करण्यात आली आहेत.

( Guidelines for the birth anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj; See what the rules are. )

छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj ) यांच्या जंयती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी आज मान्यता दिली.

तथापि, आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

येत्या शनिवारी (19 फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई ( Minister of State for Home Affairs Shambhuraj Desai ) यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मान्यता दिली आहे. तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत.

शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती वाहून आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योती दौडीत दोनशे जणांना सहभागी होता येईल. तसेच शिव जन्मोत्सव सोहळ्यात पाचशे जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.

बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दि.14 सोमवारी याबाबत नवीन मार्गदर्शक सुचना( Guidelines ) जाहिर केल्या आहेत. नवीन मार्गदर्शक सुचनांनूसार सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास मनाई किंवा अॉनलाईन घेवून गर्दी टाळणे, बाईक रॕली, मिरवणूक येवू नयेत, तसेच शिवजयंती साध्या पध्दतीने साजरी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शिवाय शिवजयंती दिवशी सोशल डिस्टंटींगचा वापर करुन आरोग्य विषयक शिबिर रक्तदान सारखे उपक्रमाचे आयोजन करुन कोरोना, मलेरिया, डेंग्यू आजारावर प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता विषयी जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!