Hailstorm in Dharur धारुर तालुक्यात गारपीटीचा तडाखा ; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.

किल्लेधारुर दि.29 एप्रिल – Hailstorm in Dharur धारुर तालुक्यात गारपीटीचा मोठा फटका बसला आहे. आज दि.29 शनिवार रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास शहराच्या जवळच असलेल्या गावांत गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
( Hailstorm in Dharur taluka; Huge loss to farmers. )
गेल्या महिनाभरापासून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत वीज पडून मोठ्या प्रमाणात जिवितहानी झाली तर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासन दरबारी अद्यापही तालुक्यातील शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत असताना अवकाळीचा रुद्रावतार दिवसेंदिवस वाढतच आहे. आज दि.29 शनिवारी धारुर Dharur शहरालगत असलेल्या वावरासह अनेक गावांना गारपीटीचा फटका बसला. शहराजवळ असलेल्या खारी या शेतीपट्ट्यासह कासारी पाटी, तांदूळवाडी, गांजपुर येथे गारपीटीमुळे Hailstorm फळबागा व भाजीपाला शेती उध्वस्त झाली. गांजपूर येथील शेतकरी विठ्ठल बाबुराव सिरसट यांच्या दोन एक्कर मिरची तर आबासाहेब अंबाजी सांगडे या शेतकऱ्याच्या दोन एक्कर क्षेत्रातील सिमला मिरची जमीनदोस्त झाली. याशिवाय अंबा, सोयाबीन, घेवडा आदी पिकांचे नुकसान झाले आहे. Hailstorm in Dharur