पोटच्या दारुड्या मुलाने केला बापाचा खून; बीड जिल्ह्यातील घटना.

शिरूर कासार दि.24 जुलै – बीड (Beed) जिल्ह्यात दिवसेंदिवस आई वडिलांवर हल्ला करण्याच्या घटना वाढत असून महिनाभरातील अशी तिसरी घटना समोर आली आहे. दारू पिऊन घरी आल्याबद्दल जाब विचारल्याच्या रागातून चिडलेल्या मद्यधुंद पोराने (drunken son) बापावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पित्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

(Father killed by drunken son; Incidents in Beed district.)

शिरूर कासार तालूक्यात लिंबा येथे ही घटना घडली. दारुड्या मुलावर शिरुर का. पोलिसात (Police) खुनाचा (Murder) गुन्हा नोंद झाला आहे. गणेश बाबासाहेब नागरगोजे (वय 50) रा. लिंबा, ता. शिरूर का. असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गणेश नागरगोजे यांचा मुलगा स्वामी यास दारूचे व्यसन आहे. मंगळवार (13 जुलै) रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास स्वामी दारू पिऊन घरी आला. त्यामुळे गणेश यांनी त्याला दारू पिऊन घरी का आलास असा जाब विचारला आणि त्याची कानउघडणी केली.

वडिल रागावल्याने संतापलेल्या स्वामीने थेट चाकूने बापावर हल्ला चढविला आणि कपाळावर, खांद्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात गणेश गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी दि.20 जुलै दुपारी दिड वाजता त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस हवालदार हरी जाधव यांनी शिरूर पोलीस (Police) ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. सदर फिर्यादीवरून स्वामी गणेश नागरगोजे याच्यावर खुनाचा (Murder) गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!