कोरोंना विशेष

भयावह … चक्क कचरागाडीतून मृतदेह; माणूसकीची विटंबणा.

नालंदा (वृत्तसंस्था) दि.17 मे – देशात कोरोनाच्या (covid-19) दुसऱ्या लाटेनं हाहा:कार माजवला आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत असली तरीही मृताच्यां आकडेवारीची चिंता कायम आहे. दोन आठवड्यापांसून देशात दररोज सरासरी चार हजार कोरोना रुग्णांचा मृत्यू (Corona Death) होत आहे. बिहारमधील भयावह परिस्थितीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्णांना घेऊन जाण्यासाठी प्रशासनानेच कचरा गाडीचा वापर केल्याचा हा व्हिडीओ आहे.

(Horrible … corpses from a chucky trash can; Defamation of humanity.)

आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्यामुळे अनेकांचा मृत्यू (Corona Death) होत आहे. त्यातच कुणाकडे मृतदेह घेऊन जाण्यासाठी पैसे नसतात. तर काही ठिकाणी प्रशासन कोरोना रुग्णावर अंत्यसंस्कार करतात. बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील परिस्थिती आणखी चिघळली आहे. अनेक लोक नदीत मृतदेह टाकत आहेत. तर काही जण नदीच्या किनाऱ्याला वाळूत पुरत आहेत. बिहारमधील भयावह परिस्थितीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

देशात कोरोनाची (Covid-19) विदारक परिस्थिती पाहायला मिळत असून उत्तर प्रदेशमध्ये गंगा नदीच्या प्रवाहात अनेक मृतदेह वाहत असल्याच्या बातम्या आपण पाहिल्या आणि वाचल्या आहेत. कोरोना बाधित (Corona Positive) मृतदेहांची अशी विटंबना होत असून परिस्थिती धक्कादायक बनत आहे. रुग्णालय प्रशासन आणि नातेवाईकांमध्येही चांगलेच वाद होताना दिसत आहेत. कुठे इंजेक्शनची कमतरता, कुठे ऑक्सिजनची कमतरता, कुठे बेडची कमतरता दिसून येत आहे. त्यातच आता स्मशानभूमीतही रांगा लागल्याचं चित्र दिसून आलं आहे. बिहारच्या नालंदा येथील सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नालंदा येथील हा व्हिडिओ आहे. कोरोना रुग्णांना घेऊन जाण्यासाठी प्रशासनानेच कचरा गाडीचा वापर केल्याचा नालंदा (Municipal Corporation in Bihar’s Nalanda) येथील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. एएनआयनं व्हिडिओ ट्विटर पोस्ट केला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं असून संबधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात येत आहे.

व्हिडिओमध्ये नालंदा नगरपालिकेचे (Municipal Corporation in Bihar’s Nalanda) दोन कर्मचारी कचरागाडीमध्ये रुग्णाला घेऊन जात असल्याचं स्पष्ट दिसत आहे. नगरपालिकेचे कर्मचारी पीपीई किटमध्ये दिसत आहेत. मात्र, मृतदेहावर फक्त चादर अंथरण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. नगरपालिकेकडे रुग्णवाहिका आणि पीपीई किट नाही का? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!