मिशन बिगिन अगेन अंतर्गत पुण्यात आठवडे बाजार सुरु

पुणे दि.५(प्रतिनिधी) मिशन बिगिन अगेन अंतर्गत पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आठवडे बाजार सुरु करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी घेतला असुन जनतेसाठी कोरोना बाबत पाळण्याच्या सुचनाही या आदेशात देण्यात आल्या आहेत.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ १३ मार्च रोजी लागू केला होता. यामुळे सुरक्षेच्या कारणाने गावपातळीवर भरवण्यात येणारे आठवडे बाजार बंद करुन कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्याचा उपाय करण्यात आला होता. मात्र टप्प्यात शिथिलता देण्याच्या उद्देशाने शासनाने मिशन बिगिन अगेन ची अधिसुचना काढली आहे.या अंतर्गत पुणे जिल्ह्यातील गाव पातळीवर भरवण्यात येणारे आठवडे बाजार प्रतिबंधीत क्षेत्र वगळून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशा स्वरुपाचे आदेश दि.४ रोजी पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी काढले आहेत. आठवडे बाजार भरवत असताना नागरीकांसाठी अनेक सुचनांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.