अंबाजोगाईजवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात; सहा ठार, दहा जखमी.

अंबाजोगाई दि.9 जानेवारी -अंबाजोगाई – लातूर (Ambajogai Latur) रोडवर बर्दापूर जवळ नंदगोपाल डेअरी समोर आज (दि.9) सकाळी 8.30 वा. लातूर – औरंगाबाद बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली.

(Horrific bus and truck accident near Ambajogai; Six killed, ten injured.)

या अपघातात सहा जण जागीच ठार आणि दहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात एवढा भीषण होता की क्रेनच्या साह्याने दोन्ही वाहने बाजूला करून जखमींना बाहेर काढावे लागत आहे.

जखमींवर अंबाजोगाईच्या स्वाराती (SRTR) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात (Accident) होण्याचे कारण सकाळचे धूके असल्याचे सांगितले जात आहे. अपघातात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मृतात बहूतेक जण एसटी बसमधील (ST Bus) असून ट्रकचा चालकही गंभीर जखमी आहे. घटनास्थळी पोलिस व स्थानिकांकडून मदतकार्य सुरु आहे. मृत व जखमीची नावे अद्याप समोर आली नव्हती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!