मी जीन्स वापरतो… ते मलां आवडतं…. आ. रोहीत पवार

माजलगाव दि.१६(प्रतिनिधी) आ. रोहीत पवार (Rohit Pawar) यांनी आज माजलगाव शहरातील संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात बोलताना मी जीन्स वापरतो ते मला आवडतं म्हणून मी ज्या युवा वर्गाचे प्रतिनिधित्व करतो त्यांचा या पेहराव आहे म्हणत आपली स्वतः ची ओळख निर्माण करा जग काय बोलेल यापेक्षा आपले ध्येय निश्चितीसाठी प्रयत्न करा असा मंत्र तरुणाईला दिला.
माजलगाव येथील सुंदरराव सोळंके महाविद्यालयात आयोजित सवांद तरुणाई या कार्यक्रमात आ.रोहित पवार (Rohit Pawar) बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आ. प्रकाशदादा सोळंके (Prakash Solanke) यांनी विद्यालयातील शैक्षणिक बाबी अधोरेखीत करत नवनिर्माणाच्या संकल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडल्या. यावेळी आ.रोहीत पवार यांनी शिक्षण घेऊन रोजगार निर्मिती केली पाहिजे असे मत व्यक्त करत स्वतः केलेल्या कार्याचा आढावा यावेळी पवार यांनी मांडला. तरुणांचा विविध प्रश्नांची उत्तरे देत आ. रोहित पवार यांनी तरुणांना आकाशाला गवसनी घालण्यासाठी जग काय बोलतं याकडे दुर्लक्ष करण्याचा मंत्र दिला. एखाद्याची नक्कल करण्यापेक्षा आपलं स्वतःचे अस्तित्व तयार करा असे आवाहन केले. समाजकारण करण्यासाठी राजकारणात आल्यांचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले. पुढे बोलताना राजकारणात पांढरा पेहराव म्हणजे स्वच्छ प्रतिमा असा होत नाही, मी युवकांचे नेतृत्व करतो ज्यांचं नेतृत्व करतो त्यांचा पेहराव मी वापरतो. जीन्स मला आवडते ते मी वापरतो असं म्हणत तरुणांनी आपल्याला जे क्षेत्र आवडते त्या क्षेत्रात भविष्य घडवावं, युवकांनो आधी भविष्य तयार करा नंतरच राजकारण करा असं मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून आ.प्रकाशदादा सोळंके (Prakash Solanke), प्राचार्य व्ही.पी.पवार, जिल्हा परिषद सदस्य जयसिंग सोळंके (Jaysing Solanke), भानुदास डक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार जयसिंग सोळंके (Jaysing Solanke) यांनी मांडले.