हवामान

IMD alert … मराठवाड्यासह राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा ; हवामान खात्याने दिला अलर्ट.

48 / 100

मुंबई दि.28 जून – मराठवाड्यासह राज्यात आजपासून तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, मराठवाडा, विदर्भ व कोकणसाठी हवामान विभागाने अॉरेंज अलर्ट तर मुंबईसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.

IMD alert … Warning of heavy rain in the state including Marathwada; The Meteorological Department has issued an alert.

मागील तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रात संततधार पाऊस सुरु आहे. उशिरा का होईना, पण मान्सूनने (Mansoon) महाराष्ट्रात जोरदार आगमन केले आहे. शनिवारपासून मुंबईसह राज्यात पावसाने (Rain) हजेरी लावत सर्वांना दिलासा दिला आहे. दरम्यान, दोन तीन दिवसांपासून पाऊस धो-धो कोसळत आहे. पुढील तीन ते चार दिवस मुंबईसह (Mumbai) राज्यात अतिमुसळधार heavy rains पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. तसेच ऑरेज अलर्ट देखील हवामान विभागाकडून (Meteorological Department) जारी करण्यात आला आहे. तर मुंबईत यलो अलर्ट yellow alert देण्यात आला आहे.

मराठवाड्यात ऑरेंज अ‍लर्ट.
मराठवाड्यातील Marathwada सर्व जिल्ह्यात मुंबईसह उपनगरांत, रायगड, पुणे, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज आणि उद्या हवामान खात्याकडून राज्याला ऑरेंज आणि येलो अलर्ट orange alert देण्यात आला. तसेच मुंबईसह पालघर, ठाणे जिल्ह्यांनाही अ‍लर्ट देण्यात आला आहे. मुंबईत जोरदार पाऊस heavy rain बरसल्याने पहिल्याच पावसात मुंबईकरांची दैना उडाली आहे. पहिल्याच पावसात मुंबईत अंधेरी सबवेमध्ये नदीचे स्वरुप आले आहे. सायन, दादर, बोरिवली, दहिसर आणि जोगेश्वरी परिसरात अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. अनेक घरांमध्ये पाणी भरलेले दिसून आले. पावसामुळं मुंबईत चार ठिकाणी घरं कोसळली. यात मुंबईत सहा जणांना जीव गमवावा लागला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!