औरंगाबाद व उस्मानाबादच्या नामांतरास तूर्त स्थगिती ; राज्य सरकारचा निर्णय.

मुंबई दि.15 जुलै – औरंगाबाद व उस्मानाबादच्या नामांतरास तूर्त स्थगिती देण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. ठाकरे सरकारकडून दि.29 जुन रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद व उस्मानाबादच्या नामांतरास मंत्रिमंडळाची मंजूरी देण्यात आली होती.
दि.29 जुन मंगळवार रोजी ठाकरे सरकारची कॅबिनेट बैठक झाली होती. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे ( Aurangabad ) नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचे ( Osmanabad ) नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला (Navi Mumbai International Airport) दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी स्वतः बैठकीसाठी मंत्रालयात यावेळी उपस्थित होते.
या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी ठाकरे सरकार अल्पमतात येवून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शपथ घेतली होती. यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नामांतराच्या विषयी बोलताना सरकार अल्पमतात असताना घेतलेला निर्णय कायदेबाह्य असल्याचे सांगितले होते. याच दरम्यान एमआयएमचे (AIMIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jalil) यांनी औरंगाबाद व उस्मानाबाद शहराच्या नामांतरास कडाडून विरोध केला होता.
राज्यातील औरंगाबाद व उस्मानाबाद शहराच्या नामांतरावरुन अनेकांनी विरोधाची भुमिका घेत नाराजी व्यक्त केली होती. काही दिवसांपुर्वीच औरंगाबादमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान विद्यमान शिंदे फडणवीस सरकारने मागच्या ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयास स्थगिती देण्याची भुमिका घेतली आहे. कालच नगरसेवकातून नगराध्यक्ष व सदस्यांतून सरपंच निवडण्याच्या निर्णयाला स्थगिती देवून जनतेतून नगराध्यक्ष व सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला. यानंतर आज तुर्त औरंगाबाद व उस्मानाबाद शहराच्या नामांतराच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.
( Immediate suspension of renaming of Aurangabad and Osmanabad; Decision of Shinde Fadnavis Govt. )