धारुर परिसर… धारुरच्या क्रीडा प्रशिक्षण केंद्रात भ्रष्टाचार; अर्धवट कामे पुर्ण दाखवण्याचा घाट?

किल्लेधारूर दि.28 अॉगस्ट – आज सर्वत्र राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होत असताना धारुर शहरातील तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्र हे अनेक समस्यांचे माहेर झाल्याचे दिसत आहे. येथील अनेक वर्षांपासून अर्धवट अवस्थेतील कामे रंगरंगोटी करुन क्रीडाप्रेमींची फसवणूक (fraud) करण्याचा प्रयत्न क्रीडा विभागाकडून होत असल्याचे दिसुन येत असून अर्धवट कामे पुर्ण दाखवून लाखोचा मलिदा लाटण्याचा प्रयत्न क्रीडा विभागाकडून (Sports department) होत असल्याची चर्चा होत आहे.
(Dharur premises … Corruption in Dharur sports training center; Ghat to complete partial work?)
आज जिल्ह्यात हॉकीचे जादुगर म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस क्रीडा दिन म्हणून साजरा होत आहे. या निमित्तानं जिल्ह्यात क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. किल्लेधारूर (Dharur) शहराला मोठा क्रीडा वारसा असून येथून कबड्डी, कुस्ती व व्हॉलिबॉल सारख्या क्रीडा क्षेत्रात अनेक राष्ट्रीय खेळाडू देशपातळीवर चमकले आहेत. जिल्ह्यात क्रीडा व युवक संचालनयाकडून किल्लेधारूर येथे चोवीस वर्षापूर्वी पहिले तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्र (sports training center) सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अनेक वर्षानंतर येथील सर्वे नं. 378 या शासकीय गायरानातील दोन हेक्टर जमिनीत क्रीडा प्रशिक्षण केंद्राला संरक्षक भिंत बांधून अंतर्गत व्हॉलीबॉल व कबड्डीच्या मैदानासह दोनशे मीटरचे रंनिग ट्रॅक बनवण्यात आले. तर आठ वर्षापूर्वी टेनिस हॉलसह कार्यालयाची इमारत बांधकाम लाखो रुपयांचा खर्च करुन बांधण्यात आली.
परंतू आठ वर्षांचा कार्यकाल संपत असतानाही सदरील इमारत छत व इतर कामाशिवाय अद्यापही अपुर्ण आहे. विशेष म्हणजे इमारतीच्या दरवाजासाठी वापरण्यात आलेले सागवानी चौकटी सडुन गेली आहेत. ना छत ना फरशी अशा अर्धवट अवस्थेत असलेल्या या इमारतीला सध्या रंगरंगोटी करण्याचे काम सुरु आहे. यामुळे लाखो रुपयांना चुना लावून मोठा भ्रष्टाचार (Corruption) करण्याची तयारी क्रीडा विभागाकडून होत असल्याची चर्चा क्रीडाप्रेमी वर्गात होत आहे. याप्रकरणी तात्काळ दर्जेदार काम करुन खेळाडूंची सोय करावी व निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.