मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय ; नगराध्यक्ष व सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार.

मुंबई दि.14 जुलै – मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) नगराध्यक्ष व सरपंच थेट जनतेतून निवडण्यासह अनेक महत्वाच्या निर्णयांची घोषणा केली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
1)राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अभियान” राबविण्यात येणार.
(नगर विकास विभाग)
2)केंद्र पुरस्कृत अमृत अभियान 2.0 (Atal Mission For Rejuvenation & Urban Transformation) राज्यात राबविणार
(नगर विकास विभाग)
3)नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेणार
(नगर विकास विभाग)
4)राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा.
(ग्रामविकास विभाग)
5)अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविणार
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1969 मधील कलम 43 मध्ये सुधारणा.
(ग्रामविकास विभाग)
6)बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मध्ये सुधारणा.
(पणन विभाग)
7)आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान / यथोचित गौरव करण्याची (दिनांक 31 जुलै, 2020 रोजी बंद करण्यात आलेली ) योजना पुन्हा सुरु करणार
(सामान्य प्रशासन विभाग)